पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण १४६ आढळून आले को पाश्चात्यांतील प्राचीन रसविद्या व आपल्याकडील रसविद्या यांत बरेच साम्य असून, बहुधा आपल्या देशांतूनच ही रसविद्या तिकडे गेली असावी ? असे मानण्यास उत्तम कारणे दिसू लागली ! यामुळे पाश्चात्य रसग्रंथ वाचण्याची उत्कंठा उप्तन्न झाली व त्याप्रमाणे पाश्चात्य रसग्रंथा पैकी काही वाचीत आहे. बेनिडिक्टस फिग्युलस. हा कवि, ग्रंथकार, तत्ववेत्ता, वैद्य व जर्मनीतील युटेन होफेन येथील संन्यासी होता. यास रसविद्येचाही बराच नाद असे; पण यास ही विद्या साधली होती की नाही हे नीट कळून येत नाही. हा फक्त साधक होता; यास सिद्ध पदवी मिळाली नव्हती असे दिसते. हा प्रसिद्ध पाश्चात्य रससिद्ध थियोमास्टस पॉरसेल्सस् याचा मोठा चहाता असून त्याचा अनुयायी होता; याने त्याचे ग्रंथ मिळवुन प्रसिद्ध करण्याची खटपट केली. याने रसवियेवरील, आपल्या पूर्वीचा अनेक पुस्तके मिळवून एक, The Golden and Blessed casket of Napire's marvels. या नांवाचे पुस्तक लिहिलेले आहे; त्याचे आतां इंग्रजी भाषांतर झालेले आहे. हा सिद्ध नसल्यामुळे याची वाणी अधिकारयुक्त नाही. याने स्वतंत्र ग्रंथ न लिहितां फक्त प्राचीन ग्रंथांचे संपादन, टीका वगैरे मात्र केलेल्या आहेत. याच्या हतर ग्रंथांची नावे अश:- (2) The Heavenly Tripartite Golden Treasury. (3) The New Olympic and blessed Rosary. (4) Hortulus Olympicus Aureolus. (5) The Golden Heructic Paradise. याशिवाय त्याचे आणखी कांहीं ग्रंथ आहेत; पण ते तितके महत्वाचे नाहीत. हे ग्रंथ जर्मनीत बहुतेक इ. स. १६०८ च्या सुमारास वरील ग्रंथकाराने प्रसिद्ध केले.