पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ [ प्रकरण भारतीय रसायनशास्त्र वैद्यभास्करोदय ह्याची प्रत वरील बडोद्याच्या गृहस्थांकडूनच मिळाली, हा धन्वंतरीनें केलेला आहे. असे यांत ह्मटलेले आहे. यांत हारतालकल्प, हिंगुलकल्प, मनशिळ कल्प, व विषकल्प या प्रमाणे चार परिच्छेद आहेत. यांत ९० श्लोक एकंदरीत आहेत. हा ग्रंथ या चार कल्पांनीच संपला की पुढे ही। होता हें कांहीं समजत नाहीं. | सिद्रिकल्प, स्वर्णतंत्र व वैद्यभास्करोदय हे तिन्हीं लहान लहान ग्रंथ रसविद्येच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. स्वर्णतंत्रांत एकंदर १९ वेगळाल्या वनस्पतींचे कल्प असून एकंदर २२५ श्लोक आहेत. स्वर्णतंत्र तेवढ्यालाच संपले असे दिसत नाही, कारण स्वर्णतंत्रांत जे प्रयोग आहेत म्हणून मी ऐकत होतो त्यांपैकी बरच यांत आढळून आले. पण कांहीं आढळले नाहीत. यावरून कांहीं भाग अझून मिळाला नाहीं असें दिसते. पुढील शोधकांस तो मिळविण्यास बरे पडावे म्हणून मला मिळालेल्या स्वर्णतंत्रांतलि कल्पांची नांवे देऊन ठेवितो. या माझ्या कल्पांत मुख्य कोरफडीचा कल्पच नाहीं. तो स्वर्णतंत्रांत आहे ह्मणून प्रसिद्ध आहे. स्वर्णतंत्रांतील कल्पः-- १ तैलकंद, २ कटुकूष्मांड, ३ कटु ऋद्धिवल्ली, ४ कटुतुंबी ( कडु भोंपळा ), ५ सिद्धवल्ली ( श्वेतगिरिकणी ), ६ चैत गोवार, ७ चैतस्तैरड, ८ काकतुंडी ( काकारी ), ९ वैगरी, १० दग्धरोहा, ११ श्वेतबृहती ( पांढरी रिंगणी ), १२ कांटे शिर ,, कांटे पळस, १४ पळसवेल १५ रिंगणीवेल ( वल्लीत्रिषिरा ), १६ श्वेतनिशा ( पांढरी हळद ), १७ नखशिखणी ( ब्रह्मांडभेदिनी), वादि पांच फळांचा कल्प, १९ त्रिधारा वज्रवली (तिधारी कांट इतक्यांचे कल्प आहेत, असो. राहिलेले कल्प पुढील मंडळींस मिळतील अशी आशा आहे.