पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ वें. ] स्वर्ण तंत्र. १४३ जांबेकर यांजकडून मिळाली. हे स्वर्णतंत्र शंकराने परशुरामास सांगितलेले आहे असे वर्णन आहे. प्रारंभी प्रस्तावना अशी आहेःराम उवाच ॥ यस्याः साधनमात्रेण स्वर्णतुल्यो नरो भवेत् ॥ तां सिद्धिं वद मे देव ! यदि त्वं भक्तवत्सलः ॥ २ ॥ पूर्व तु कथितं देव ! रत्नतंत्रं त्वया मम ॥ गुटिकाः कथिताः पूर्व सहस्राद्वतयं शिव ॥ ३॥ पारदाः कथिताः पूर्वं षट्शतं मृत्तिरूपकाः ॥ धातूनामष्टकल्पस्तु पूर्वमेव प्रकाशितः ॥ ४ ॥ रत्नानां करणं तंत्रं पूर्वमेव प्रकाशितं ।। किं तु स्वर्णाख्यतंत्रं तु मम त्वं कथय प्रभो ॥ ५॥ कश्यपेन महेशान ! भर्तिसतोऽस्मि महेश्वर । भूमिदानं मयादत्तं ऋषये कश्यपाय वै ॥ ६॥ कश्यपेन तदा प्रोक्तं भूमिभागं त्यज प्रभो।। स्थानार्थं तु महेशान ! रक्तब्धः प्रार्थितो मया ॥ ७ ॥ बाहुमात्रं स्थलं तेन दत्तं मम महेश्वर ॥ स्थान प्राप्तं महेशान ! भक्षणं मम नास्ति वै ॥ ८ ॥ भक्षणं देहि मे देव ! यदि पुत्रोऽस्मि शंकर ! शंकर उवाच-शृणु राम ! प्रवक्ष्यामि रहस्यातिरहस्यकं ॥९॥ | स्वर्णतंत्राभिधं तत्रं कल्परूपेण कथ्यते ॥ पुढे तैलकंदादिकांचे कल्प दिलेले आहेत. वरील उता-यांत रत्नतंत्र, गुटिकाकल्प, पारदकल्प व धातुकल्प यांचा उल्लेख आलेला आहे. रत्नतंत्र व गुटिकाकल्प कोठे ऐकूनही माहीत नाहीत. पारदकल्प व धातुकल्प मात्र उपलब्ध आहेत. पारदकल्पाविषयी मार्गे लिहिलेलेच आहे. धातुकल्प पाहावयाचा आहे. तो मिळतो हे मात्र खरे. या सुवर्णतंत्रांत अनेक वनस्पतींचे कल्प आहेत. ते येथे देत बसल्यास फार विस्तार होईल असो. १ हाच सध्याचा Red sea तांबडा समुद्र असेल काय ? Caspian sea हा काश्यपी समुद्र दिसतो. काश्यप व परशुरामाचा Red sea जवळ गांठ पडली असेल.