पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ वें. ] भैरवसिद्धि कल्प. १४१ मूषागर्भादरे धृत्वा धामयेत्खदिरानले। गुटिका जायते तेन महाभोगप्रदायिनी ॥ पुढे या गुटिकेचे महत्व सांगितलेले आहे. नंतर दुसरी एक गुटिका सांगितलेली आहे तिची कृति अशीः-- अथाश्वक्रांतिमादाय वज्र वैक्रांतकं क्वचिम्। गगनं तारसंयुक्तं त्रिलोहं च महारसं ॥ त्रिदंडेन मर्दयित्वा अम्लवर्गप्लुतं कुरु ॥ जायते चितयं भूयो तप्तखल्वोदरे क्षिपेत् ॥ जारितं समभागेन लोहवत्कारयेत् प्रिये ।। वज्रमूषाघृतं तत्तु गुटिका कारयेत्तथा ॥ त्रैलोक्यसुंदरी नाम्ना ततो देवसमो भवेत् ॥ पुढे अनेक प्रयोग आहेत. त्या सर्वांचे उतारे येथे देणे शक्य नाहीं. या ग्रंथांत, कोकचंडीश्वरीमत, नित्यनाथाचे रसरत्नाकर, नागार्जुन वैद्यविनोद वगैरेंचा उल्लेख आहे. __ प्रकरण ३१ वें. ॐ भैरवसिद्धि कल्प. ॐ याची एक हस्तालाखत प्रत बडोद्याचे रा. विनायक सदासिव जांबेकर यांजकडून पाहण्यास मिळाली. याचे एकंदर २८५ श्लोक आहेत. यापैकी सुमारे १५० श्लोक नवीन असून त्यापुढचे सर्व श्लोक रसाणवांतून उतरून घेतलेले दिसले सुमारे १५० श्लोकांपुढच्या श्लोकांत अनेक रसबंधक औषधींचा संग्रह आहे; हा रसावांतूनच घेतलेला आहे. पहिले १५० श्लोक मात्र दुसरीकडे अनुपलब्ध व अतएव नवीन आहेत. प्रस्तावना संपल्यानंतर ग्रंथकार ह्मणतातः--