पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० वें. ] काकचंडीवरीमत. १३९. जलौका बंधमित्याहुर्धातुवादं रसायनं ।। जारणं मारणं चैव द्रावणं चाभ्रकस्य तु ॥ तस्योपायं च देवेश ब्रूहि मे त्रिपुरांतक । रसकर्म तथा देव सारभूतं वदस्व मे । वरील प्रश्नांवरून वरील सर्व विषय मूळच्या काकचंडीश्वरीमतांत होते असे वाटते. सध्याच्या विश्वनाथपादाच्या अवलोकनांत बरेच यांतील विषय आलेले आहेत. काकचंडीदेवीने प्रश्न करून माहिती सांगितली ह्मणून यास काकचंडीश्वरीमत असे नांव पडलें, की काकचंडीश्वर नांवाच्या सिद्धाने एक ग्रंथ लिहिला ह्मणून त्यास हे नांव पडले हे मूळग्रंथ पाहिल्याशिवाय सांगणे काठिण दिसते. वरील भैरवीचे प्रश्न ऐकन भैरव ह्मणतातः न द्रव्येण विनासिद्ध न भोगः काममेव च । द्रव्यहीना नरा लोके प्रेतरूपेण संस्थिताः ॥ अटंति मृत्युलोके च परोपद्रवकारकाः। श्वानवजीवितं तेषां जीवतोऽपि हि मृताहिते ॥ कालसंभोगरूपेण पांडित्यज्ञासंयुताः । द्रव्यहीना न शोभंत्ये; प्राणहीना यथा तनूः ॥ तस्माच्च साधयेदेवि ! रसेंद्र साधकेश्वरं । तं देवि कथयाम्यद्य साधकानां हितं प्रिये ॥ जारणं मारण देवि द्रव्यसाधनमुत्तमं ।। रसानां जायते सिद्धिः कामार्थ भोगसाधनं ॥ एवढी प्रस्तावना झाल्यानंतर कांहीं रससाधनाचे प्रयोग यांत दिलेले आहेत. कांहीं प्रयोग महत्वाचे असल्यामुळे व त्याच्या हस्तलिखित । सर्वासच मिळणे कठिण असल्यामुळे, ते येथे उतरून घेतों: वज्रदंडं सुदंडं च लोहदंडं तथैव च। औषधत्रमेतच्च रसस्य मरणे हितम् ॥ १ ॥ वज्रदंडो यथा वज्र, लोहदंडो वटस्य च।। सुदंडो ब्रह्मदंडस्तु समासात्परिकीर्तिताः ॥ २॥