पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० वे ] १३७ प्रकरण ३० वै. । ॐ रसराजसमुच्चयांतील ॐ काकचंडीश्वरीमत. मेजजवळ एक पोथी मिळालेली आहे तिच्या शेवटी • श्रीविश्वनाथपादविरचिते रससर्वस्वे रसराजसमुच्चये काकचंडीश्वरीमतं संपूर्ण ' असे लिहिलेले आहे. ही पोथी मला तासगांवचे दे. माधव शंकर सोहोनी यांजकडून मिळाली. वरील पदांवरून आपणांस या ग्रंथाविषयीं व ग्रंथकर्याविषयी काय बोध होतो, ते पाहू. विश्वनाथ पाद हे एखाद्या भिक्षुचे किंवा संन्यास्याचें नांव दिसते. आतां यांनी रचिलेल्या ग्रंथाचे नांव रससर्वस्व असावे कीं, रसराजसमुच्चय असावे, हे पाहिले पाहिजे, एकंदरीत विचार करतां * रससर्वस्वे ' हे विशेषण असून रसराजसमुच्चय हेच ग्रंथाचे नांव असावे असे दिसते. त्यांत ग्रंथकर्त्याने अनेक प्राचीन रसग्रंथांतील विषयांचे समालोचन केलेले असल्यामुळे त्यास रससर्वस्व हे विशेषण दिलेले दिसते. सारांश, विश्वनाथपाद यांनी एक महत्वाचा रसराजसमुच्चय नांवाचा ग्रंथ लिहिला व त्यांत अनेक प्राचीन ग्रंथांचे व त्यांतील विषयांचे निरीक्षण केलें. अशा ग्रंथांपैकींच • काकचंडीश्वरीमत' हा एक ग्रंथ आहे. याचे हे निरीक्षण प्रस्तुतच्या पोथींत आहे. ह्मणजे रसराजसमुच्चयापैकीं, काकचंडीश्वरीमताच्या निरीक्षणाचा भाग मला मिळालेला आहे, हे उघड होते हा विश्वनाथपादांची रसराजसमुच्चय ग्रंथ, वाग्भटाच्या रसरत्नसमुच्चयाहून अगदी भिन्न होय हे वाचकांनीं विसरू नये. विश्वनाथपादाने ज्या ‘काकचंडीश्वरीमता'चे निरीक्षण केलेले आहे तो मूळग्रंथ ७०० श्लोकांचा असून, तो काकचंडीश्वराने लिहिलेला आहे. हा ग्रंथ नेपाळदर्बार लायब्रीमध्ये सध्या उपलब्ध असून प्रो. हाय Histry of Hindu Chaneistry याचे क-यांस पाहण्यास मिळालेला होता. विश्वनाथपादानी रसराजसमुच्चयांत, १८