पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण या प्रस्तावनेवरून हा ग्रंथ सर्वांची एकच खिचडी अशा स्वरूपाचा कसा बनला आहे हे समजून येईल. पं. दत्ताराम चौबे यांनी आपणांस मिळालेल्या मूळ ग्रंथांच्या शुद्धाशुद्ध प्रती जशाच्या तशाच भाषांतरासह स्वतंत्र छापल्या असत्या तर त्या त्या ग्रंथकारांचा विषय विवेचनाचा क्रम तरी कळून आला असता, व त्यांच्या हस्तलिखित प्रतीशी इतर प्रती ताडून पाहतां आल्या असत्या. आता त्यांनी केलेले हे काम, शास्त्रीय दृष्टया पाहतां, पालथ्या घागरीवर पाणी ओतल्याप्रमाणे झालेले आहे. कोणत्या ग्रंथांतला कोणता मजकूर आहे, हे कळण्यास साधन नाहीं: शिवाय ग्रंथांतील श्लोक कोणते व यांनी स्वतः बनवून घातलेले श्लोक कोणते हेही समजण्यास यांत मार्ग नाही. यामुळे या ग्रंथास खिचडी ह्मणावे लागते, संग्रह या दृष्टीने व रसपरिभाषा सोडवून, अगदीच अज्ञात अशा या रसशास्त्रीय विषयांचे भाषांतर–आपापल्या शक्त्यनुसारशुद्धाशुद्ध करण्याचा यत्न केलेला आहे ह्मणून हा ग्रंथ महत्वाचा आहे खरा पण शास्त्रीयदृष्टया पाहतां त्यांचे सर्व श्रम व्यर्थ आहेत. या श्रमांनी कांहींच निष्पन्न झाले नाही. त्यांनी मूळप्रती जशाच्या तशाच आपल्या भाषांतरांच्या सहित-छापल्या असत्या तर पुढे शुद्ध प्रती तरी तयार झाल्या असत्या, ग्रंथांतील विषयांचा अनुक्रम कायम राहिला असता व त्यामुळे या शास्त्राच्या अभ्यासांत यथाशास्त्र प्रगति झाली असती. आतां संग्रहामुळे व विशेषतः पूर्वाधामुळे हे पुस्तक उपयस नाहीं असें नाहीं; पण या शास्त्राच्या अभ्यासाच्या प्रगतीस त्याचा उपयोग नाहीं, पूर्वखंडाच्या शेवटीं पुनः संग्रहकार लिहितो की:- नाना तंत्रान्वीक्ष्य स्वमतं संयोज्य यत्नतः सुभगं । रसराजसुंदरेऽस्मिन् मध्यमखंडस्तु पूर्णतां नीतः ॥ मखंडाचे यांनी पूर्वार्ध व उत्तराधे केलेले आहेत असो. हा एक संग्रह ग्रंथ ह्मणून बरा आहे.