पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ वें ] रस प्रकाश सुधाकर. १३३ श्रीनारायणभक्तिसक्तमनसो विद्याविनोदांबुधैः । श्रीगौडान्वयपद्मनाभसुधियस्तस्यात्मजेनाप्ययम् ॥ सद्वैद्यन यशोधरेण काविना विद्वज्जनानंदकृत् ।। ग्रंथोऽयं ग्रथितः करोतु सततं सौख्यं सतां चेतसि ॥ १ ॥ देशानां सुरराष्ट्र मुत्तमतमः तत्रापि जीर्णाभिघः ।। प्राकारोऽस्ति स वेदशास्त्रनिरतैर्विप्रैश्च संशोभितः ॥ तस्मिन्विष्णुपदारविंदरतिकृत् श्रीपद्मनाभात्मजः ।। तत्पुत्रेण यशोधरेण कविना ग्रंथः स्वयं निर्मितः ॥ २ ॥ संतोषाय सतां, सुखाय सुरुजां, शिष्यार्थसिद्धये।। वैद्यानामुपजविनाय विदुषां उद्वेगनाशाय वै ॥ श्रीमदुर्गपुरंतनेऽति निपुणः श्रीपद्मनाथात्मजः । श्रीमद्भट्टयशोधरेण कविना ग्रंथः स्वयं निर्मितः ॥ ३ ॥ मला मिळालेली प्रत शके १५५२ मधली होती+ असो. या श्लोकांवरून हा यशोधर पद्मनाभाचा पुत्र असून, हे गौडब्राह्मण होते हे कळते. हे सौराष्ट्रदेशांतील जुनागड येथील राहणारे. यशोधर हा वैद्यकीचा धंदा करीत असे. याची कविता देखील फार गोड व चांगली आहे. ग्रंथ सुलभ व सरळ असून प्रसाद्युक्त आहे. यामुळे यास प्रामाणिक ग्रंथकारांत (Standard auethor ) गणिले असावे. हा ग्रंथ आपण दुर्गपुरातनांत लिहिला असे झटले आहे. हे दुर्गपुरंतन ह्मणजे जुनागढच दिसते. जीर्ण प्राकार व दुर्गपुरंतन झणजे एकच; ते जुनागढ याचेंच भाषांतर होय. हा ग्रंथ रसवैद्यक व रसविद्या या दोन्ही दृष्टीन अत्यंत महत्वाचा आहे. या ग्रंथाची अध्यायानुक्रमणिका देतो झणजे ग्रंथाचे महत्व कळून येईल:-- + याच ग्रंथाची मुंबईहून शके १७९९ उर्फ संवत् १८३५ मधील एक प्रत मिळाली.