पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२ रें.]
रसशास्त्रांची उत्पत्ति

संबंध तुटल्यासारखाच झाला; सध्यांच्या काळीं रसवैद्यकावरचेच अनेक ग्रंथ मिळत असून, खरी रसशास्त्रें फार थोडी मिळतात.
 आर्यवैद्यकांत मूलिकावैद्य, शस्त्रवैद्य, रसवैद्य व सिद्धवैद्य असे जे चार भेद आहेत, त्यांविषयी रसवैद्यांचे मत खाली दिल्याप्रमाणे आहे:-

रसेन कथितो वैद्यः मानुषो मूलिकादिभिः॥
अधमः शस्त्रदाहाभ्यां सिद्धवैद्यस्तु मांत्रिकः ॥ १ ॥
रसादिभिर्या क्रियते चिकित्सा ।
 दैवीति सद्भिः परिकीर्तिता सा ॥
सा मानुषी मंत्रकृता शिफाद्येे:।
 सा राक्षसी शस्त्रकृतादिभिर्या ॥ २ ॥
रसज्ञो देववैद्यः स्यात् मानुषो मूलिकादिभिः॥
आसुरः शस्त्रवेेद्यो हि सिद्धवैद्यस्तु मांत्रिकः ॥ ३ ॥

 यावरून वरील वैद्यांस क्रमेंकरून मानुषी, आसुरी, दैवी व सिद्ध चिकित्सा करीत असलेले असें रसवैद्यांनी ठरविलेले आहे. कालानुक्रमानेही या चिकित्सापद्धति क्रमानेंच निघाल्या असाव्यात हे साहजिकच आहे; तथापि मूलिकावैद्यक, शस्त्रवैद्यक व रसवैद्यक हीं एकमेकांपासून कालारंभांत फारशीं कांहीं दूर नव्हतीं असे दिसतें. ही वेगळाल्या परंपरेच्या लोकांत व थोडेसे मागेंपुढें पण एकाच काळीं उदयास आलीं असली पाहिजेत. यामुळेच रसवैद्यकाचा किंवा शस्त्रवैद्यकाचा फारसा उल्लेख मूलिकावैद्यकांत येत नाहीं; तसेच परस्परांच्या प्राचीन ग्रंथांत इतर पद्धतींच्या चिकित्सेविषयी फारसे कांहीं लिहिलेले आढळत नाहीं. अलीकडील रसग्रंथांत मात्र आर्यवैद्यकाच्या या चारी चिकित्सापद्धतींचा उल्लेख असून त्यांची तुलना केलेली आढळून येते. प्राचीन काळीं रसवैद्यांची ही तांत्रिकपरंपराच वेगळी होती; ते आपले रसविषयक प्राचीन तांत्रिक ग्रंथ प्रत्यक्ष शंकराकडूनचे प्राप्त झाले असे मानीत. प्राचीन रसतंत्रांत पारा व त्याचे अनेक उपयोग असून, ती तंत्रे इतर चिकित्सापद्धतीइतकीच प्राचीन आहेत. प्राचीन रसतंत्रे व रसागम ह्मणून जेवढे आहेत (ते सारे शिवाच्या नांवावर लिहिलेले आहेत ) तेवढे शकापूर्वी अनेक शतकांपासून निर्माण होत असत; व या विद्येचा प्रारंभ भरतवर्षात कमीतकमी