पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ वें ] रसप्रकाश सुधाकर. १३१ मुळे व बहुधा फार प्राचीन काळापासून ही विद्या अरबी वगैरे लोक इकडूनच शिकून गेल्यामुळे त्यांच्या ग्रंथांवरून आपल्या ग्रंथांतील दुर्बोध स्थळांवर चांगला प्रकाश पडेल. | ( ६ ) या प्रकारची तुलना होऊन, काय झाले असतां रससिद्धि होईल याची बरोबर कल्पना आल्यानंतर मग करावयाच्या प्रयोगांचे एक स्पष्ट टाचण करून नंतर उद्योगास लागावे. प्रत्येक स्थितीमध्ये काय चिन्हें होतात हे ग्रंथांतून दिलेलेच असते. क्रमाने या प्रकारे खुणा पटत चालल्या झणजे रसासाद्ध होते, यांत शंका नाहीं. अनुभव घेता घेतां विषय अधिक चांगला कळत जातो; यास्तव हे रसग्रंथ कळण्यास अनुभवाची अतिशय जरूरी आहे; पण अनुभवास सुरवात करण्यापूर्वी याविषयी साधारण कल्पनाही पण यावी लागते, त्याशिवाय आपण अनुभव तरी कसा घेणार ? प्रकरण २७ वे. ॐ रस प्रकाश सुधाकर. ॐ रसरत्नसमुच्चय कत्याने ज्या यशोधराचा उल्लेख केलेला आहे, त्याचा हा ग्रंथ आहे. हा यशोधर २७ रससिद्धांपैकी एक आहे. रसरत्नसमुचयाचा बराच भाग या ग्रंथाने व्यापलेला आहे. या ग्रंथाचीं अनुक्रमणिका प्रारंभींच यशोधराने याप्रकारे दिलेली आहेः प्रथमं पारदोत्पत्तिं कथयामि यथातथम् । ततः शोधनकं तस्य तथाष्टादशकर्म च ॥५॥ चतुर्धा बंधविज्ञानं भस्मत्वं सूतकस्य च ।। धातून शोधनं चैव मारणं गुणवर्णनम् ॥ ६॥ अष्टौ महारसाः सम्यक् प्रोच्यतेऽत्र मया खलु। तथा चोपरसानां हि गुणाः शोधनमारणम् ॥ ७॥ द (5) तिपातश्च सर्वेषां कथयामि सुविस्तरात् । रत्नानां गु ( ण. दो)...षाश्च ततो मारण शोधनम् ॥ ८॥