पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण लिहून ठेविले पाहिजेत. कोणत्याही अशुद्ध प्रतींतील पाठभेदापेक्षां स्वकपोलकल्पित पाठभेद, केव्हाही कमी प्रतीचेच होत, यांत काय शंका आहे ? कारण प्रतीच्या पाठास कांहींतरी परंपरा आहे. चुकलेल्या ग्रंथांच्या पाठांत शुद्ध करण्याला एक प्रकारचा अधिकार त्या शास्त्रांत यावा लागतो. तो येईपर्यंत पाठभेदांत फरक करू नये. स्वतःचे पाठभेद शुद्धीच्या हेतुनेंही कधीं देऊं नयेत. कारण 'गणपती बनवू इच्छिणाच्या चिता-याच्या हातून जसे माकड वठलें । तद्वत् आमच्या पाठभेदाने येखाद्या वेळी ग्रंथ विद्रुप व्हावयाचा. याकरितां लेखकाने काळजीनें भिन्न भिन्न प्रतींतील पाठभेद मात्र उतरून ठेवावे; स्वतःच्या शुद्ध घालू नयेत. ( ४ ) ग्रंथांची तुलना व विषय जिज्ञासा-एका विषयावर निरनिराळ्या ग्रंथकारांनीं कांहीं लिहिले असले झणजे प्रत्येकांच्या ग्रंथांत त्या विषयाच्या एखाद्या अंगोपांगावर विशेष विवेचन असते; किंवा एकच प्रयोग दोन तीन ठिकाणी आढळतो, त्यावेळी त्या प्रयोगाची, एकत्र तुलना करून अधिक खुलासा होतो. एका ग्रंथांत जो विषय अस्पष्ट किंवा अशुद्ध असतो, तो दुस-यांत स्पष्टपणे व शुद्धरीत्या आढळतो. ग्रंथ तुलनेखेरीज पारिभाषिक शास्त्र कधीहि नीट लागावयाचीं नाहींत. विषयजिज्ञासेस या प्रकारे ग्रंथांची व त्यांतील प्रयोगांची तुलना अत्यावश्यक आहे. (५) अरबी वगैरे ग्रंथकारांच्या ग्रंथांतूनही ही रसविद्या आढळते. त्यांतीलही सर्व भाग एकत्र करावेत, या सवींचा उपयोग भारतीय रसविद्येवरील पटल दूर करून तिजवर प्रकाश पाडण्याकडेच करावा. त्याचप्रमाणे युरोपखंडांतील मध्ययुगांतील योग्यांनीं रसविद्येवर अनेक ग्रंथ लिहून ठेविलेले आहेत, तेही मिळवून सर्व रसग्रंथांची व विषयांची तुलना करावी. अन्यभाषांतील कोणते रसग्रंथ महत्वाचे आहेत, व कोण कोण रससिट ह्मणून प्रसिद्ध आहेत हे कळण्यासाठी अलीकडे कांहीं फ्रेंच व इतर विदानानीं रसायन शास्त्रांच्या इतिहासावर, विस्तत पुस्तक लिहिली आहेत ती पहावीं. एवंच, चोहॉकडची प्राचीन जगाची पद्धत एकच असल्या