पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] १२९ प्रकरण २६ वें. ॐ रसशास्त्रांविषयींचे कर्तव्य हैं। सध्याच्या काळीं रसशास्त्रांविषयी आमच्या लोकांवर एक फार मोठी जबाबदारी आहे. आह्मीं या व असल्या इतर परिभाषिक ( टेक्निकल ) व शास्त्रीय ग्रंथांविषयी काय कर्तव्य बजाविले पाहिजे याची येथे थोडीशी चर्चा करितों. ( १ ) सर्व रसशास्त्रावरचे स्वतंत्र ग्रंथ एके ठिकाणी जमविले पाहिजेत; ते भरतखंडाच्या एकाच भागांतून न जमवितां अनेक भागांतून जमविलें पाहिजेत. हे संकृतमधीलच असावे, असा निर्बध नसावा. संकृत, हिंदी, कानडी वगैरे अनेक देशभाषांतूनही रसविद्येवरचे ग्रंथ आहेत ते सारे जमविणे जरूर आहे. भरतखंडांतील नाना भागांतील प्रती जमविण्याचे कारण एवढेच की, वेगळाल्या प्रततिं वेगळाले पाठभेद असतात; व एखाद्या प्रतीतल खन्या पाठभेदाने विषयाचा चांगलाच खुलासा होतो. ( २ ) तांत्रिक वाङ्मयांत रसविद्या पुष्कळ आढळते. सनातनधर्मीय व बौद्ध आणि जैन तंत्रांतूनही ही विद्या आहे. तेव्हां या सर्व तंत्रांतून रसविद्येविषयींचे भाग उद्धृत करून ठेविले पाहिजेत. ( ३ ) स्वतंत्र ग्रंथांच्या निरनिराळ्या प्रती एकमेकांशीं ताडून त्यांचे सर्व पाठभेद नीट काळजीपूर्वक टिपून ठेविले पाहिजेत. ज्या प्रतीवरून जो पाठभेद घेतला असेल, तो तसा तेथे लिहून ठेवावा. स्वतंत्र बुद्धी अशा ग्रंथांत शुद्धि करण्याच्या भरीस पडू नये; कारण स्वीकृत पार व्याकरणदृष्ट्या बरोबर असले तरी, विषयाच्या अज्ञात, स्वरूपामुळे, विष यदृष्टया चुकलेले असण्याचा संभव असतो. स्वतःच्या समाधानासाठी एखादी पाठशुद्धि करावीच असे वाटल्यास * स्वकपोलकल्पित पाठभेद' या सदराखाली ते पाठभेद अगदी वेगळ १७