पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण असे झटळे आहे. ही पांचवी गति ह्मणजे बाष्पीभवन (Vapowr issuiur) असावे. जीव जातांना जसा अदृश्य होतो तसा पारा बाष्प होऊन जातेवेळीही दिसत नाही, म्हणून पांचव्या अदृश्य गतीस जीवगति म्हटले आहे असे वाटते. 'जलगति' म्हणजे Eiquid state जलरूप स्थिति असावी; कढतांना वर बुडबुडे येतात ( कण अग्नीने त्वरित झाल्यामुळे ) व ते फिरूं लागतात ती ‘हंसगति' होय. मलगति' म्हणजे काय हे कळत नाहीं. ‘धूमगति' म्हणजे अदृश्य बाष्पीभवन होण्यापूर्वी दृश्य जी धुरकट वाफ दिसत असते ती स्थिति असावी, असीं शेवटची ‘जीवगति' निरुद्ध होऊन पारा अग्नींत टिकल्याखेरीज त्याची सिद्ध होत नाहीं. ही गति कशी रोधिली जाते याविषयी लिहितात कींः-- मंत्रध्यानादिना तस्य रुष्यते पंचमी गतिः ॥ ८५ ॥ मंत्र ध्यानादिकांनी ही गति शोधता येते, असे लिहिले आहे. शेवटीं पारा कसा प्राप्त होतो हे सांगितले आहे:- पतितोदरदे देशे गौरवोद्वह्निवक्रतः ॥८९ ॥ स रसो भूतले लीनस्तत्तद्देशनिवासिनः ॥ तां मृदं पातनायंत्रे क्षिप्त्वा सूतं हरति च ॥ ९० ॥ . भारतीयांना पारा प्रथम ‘दरद’ देशांमधूनच मिळाला असे दिसते; म्हणून हिंगूळ व पाण्यास ते तिकडचेच समजत. पण डा. गर्दे यांनी दाखेविल्याप्रमाणे हिमालयाच्या उत्तरेकडील दरद देशांत प्रत्यक्ष पारा व हिंगूळ मिळत नसून तो स्पेन देशांतून इकडे येत असे; पण तो दुरद देशामधून येत होता म्हणून इकडील रसवाद्यांनी त्याचा संबंध दरद देशाशी जोडला. कृथील बंगाल्यामधून येत होते, म्हणून त्यास वंग म्हणत; कथील बंगाल्यांत कोठेच मिळत नाहीं. तेथून येत मात्र असे. . ‘पारा अग्नीसही असह्य होऊन तो बाहेर पडला' या कथेने पाण्याचा अग्नि सहन न करण्याचा गुणधर्म बोधित होतो. पाण्याप्रमाणे तो बाष्प होऊन उडून जातो. पारा ‘अग्निमुख' किंवा 'अग्निस्थिर' करण्याचाच भारतीयांचा सारा प्रयत्न आहे. असो. .