पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ चैं ] रससिद्धः को होत नाहीं. १३७ नसता तर रसरत्नसमुच्चयकारानें तो उतरून घेतलाही नसता. शिवाय पूर्वीच्या रसग्रंथांत हा भेद पाळला जात असे. यास रसार्णवग्रंथाचे प्रमाण आहे. त्यांत हेच पाण्याचे पांच प्रकार दिले आहेत. यावरून सध्या अनुपलब्ध अशा प्राचीन रसग्रंथांत हे पाण्याचे वर्गीकरण होते हैं। कळून येईल, हे प्राचीन ग्रंथ अनेक होते; व ते सर्व महत्त्वाचेही होते. अलीकडील ग्रंथांतून हा भेद नष्ट झाला हे उघड आहे. पुढे रस, रसेंद्र वगैरे नांवेंकां पडली हे दिले आहेः-- । रसनात्सर्वधातून रस इत्यभिधीयते ॥ सर्व धातूंना विरघळविण्याची शक्ति ( Soevent ) यांत आहे म्हणून * रस' असे म्हणतात. रस हा पारा सर्व धातूंनां विरघळवीत असे. | रसापरसराजत्वात् रसेंद्र इति कीर्तितः ॥ सर्व रसे व उपरसे यामध्ये हा श्रेष्ठ ह्मणून यास ‘रसेंद्र' ह्मणत. देहलोहमय सिद्धि सूते सूतस्त्वतः स्मृतः ॥ देहासार्द्ध व लोहासद्धि हा देतो ( प्रसवतो ) ह्मणून यास ‘सूत' ह्मणतात. रोगपंकाब्धिमग्नानां पारदानाच्च पारदः ॥ हा रोगरूपी चिखलात मग्न झालेल्यांना पार करितो ह्मणून यास पारद ह्मणतात. सर्वधातुगत तेजो मिश्रितं यच्च तिष्ठति ॥ तस्मात्स मिश्रकः प्रोक्तो नानारूपफलप्रदः ॥' . सर्व धातूंतील तेज यांत मिश्रित होऊन यांत राहतें ह्मणून ह्यास मिश्रक ह्मणतात; हा नानारूप फळे देतो. दोषैश्च कंचुकाभिश्च रसराजो नियोजितः ।। तदाप्रभृति सुतोऽसौ नैव सिद्धयत्यसंस्कृतः ॥ ८१ ॥ दोष व कंचुको ( आवरणे ) यांनीं पारा युक्त असल्यामुळे त्यावर ( आठरा ) संस्कार केल्याशिवाय तो सिद्ध होत नाहीं. पुढे जलग, ( ति ) हंसग ( ति ) मलग, ( ति ) धूर्मग, ( ति ) व जीवगति अशा पांच गति सांगून चार गति दृश्य व पांचवी गति अदृश्य आहे।