पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण तिन्हींचा होय. त्यांच्या लक्षणांवरून त्यांना ओळखिले पाहिजे. ती लक्षणे अशी:- सूतकः–थोडासा पिवळा,रूक्षांग. दोषांनी युक्त * यावर आठरा संस्कार केले असतां देहसिद्धि व लोहसिद्ध करतो. पारदः-पांढ-या वर्णाचा. चंचल. हा अनेक योगांनी सर्व रोगांचे हरण करितो. मिश्रकः-मोराच्या पिसाच्यांतील डोळ्यांप्रमाणे याची छाया असते ( निळी )* हा देखील आठरा संस्कार झाला असतां अनेक सिद्धि देतो. वरील सर्व वर्णनांवरून रस, रसेंद्र या गणांमधील व सूतादिक गणांमधील फरक स्पष्टपणे व्यक्त होतो. रस हा * रक्त ' * सर्वदाजैविनिर्मुक्त' व ' रसायन ' ( मृआयुर्वर्धक ) असतो; तो देवांनी घेतला. रसेंद्र हाही * अतिनिर्मल' व * दोषनिमुक्त' असून, श्याव ह्म. उदीरंगाचा ( कपिश ) असतो. यावरून रस व रसेंद्र हे शुद्ध असून क्रमे करून तांबड्या व उदी रंगाचे असतात हे कळून येईल, असा शुद्ध व त्या त्या रंगाचा पारा सध्यां मिळत नसल्यामुळे मानवांनां तो दुर्लभ ह्मणून शेरा आहे. रस व रसेंद्र हे सर्वदोषनिर्मुक्त व शुद्ध असत; सूतादिक दोषयुक्त असल्यामुळे त्यांस अष्टादशसंस्कारांनीं शुद्ध व सिद्ध करून घ्यावे लागते. प्रत्येक प्रकारचा पारा रंगावरून ओळखां येतो. रस तांबडा, रसेंद्र उदीरंगाचा ( कपिश ), सूतक पिवळा, पारद पांढरा व मिश्रक निळा असतो. रंगांप्रमाणे व शुद्धतेप्रमाणे जरी वरील वर्गीकरण आहे तरी रसशास्त्रावरील वाङ्मयांत हा फरक किंवा भेद बहुधा पाळण्यात आलेला नाहीं; किंवा सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांतून हा भेद लोपला असेल, पूर्व ग्रंथांतून हा भेद असलाच पाहिजे, । * हे बारा दोष आहेत. सात कंचुक व पांच इतर दोष,

  • अंतः सुनीलो बहिरुज्ज्वलो यः । मध्यान्हसूर्यप्रतीमप्रकाशः ।