पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ दें. ] रससिद्धि का होत नाही. १२३ - शास्त्राला सोडून किंवा शास्त्र नीट रीतीनें न समजून घेतां भलत्या रीतीनें (विधिहीन ) प्रयोग केले असतां रससिद्धि मिळत नाहीं. शास्त्र अध्यनांनीं तरी नीट समजून घ्यावी किंवा सांप्रदायिक पुरुषांकडून तरी तीं समजून घ्यावीत, ह्मणजे सिद्धि मिळते. शाखें नीट कळून विधिपूर्वक प्रयोग होण्यासाठीच शास्त्राभ्यास, व संप्रदाय ( गुरुशिष्यपरंपरा ) होत ! ह्मणून शास्त्र सोडून व गुरुविना प्रयोग करू नयेत. शास्त्रांचे रहस्य नुसत्या अध्ययनाने कळलें तर बरेच झालें, रसशास्त्रांची परिभाषा वारंवारे वाचून प्रथम समजून घ्यावी, त्याशिवाय पुढे सर्वं निरुपयोगी आहे ह्मणून सोमदेवानें परिभाषा'*प्रकरणांत लिहिले आहे. रसकर्मे विधिपूर्वक व निर्मोह होण्यासाठी परिभाषा' समजणे अत्यंत आवश्यक आहे. रसनिगममहाब्धेः सोमदेवः समंतात् । स्फुटतरपरिभाषानामरत्नानि हृत्वा ॥ व्यरचयदतियत्नात्तरिमां कंठमालं ।। कलयति ( तु ) भिषगभ्यो मंडनार्थ सभायः ॥ | रसशास्त्रावर जे अफाट समुद्राप्रमाणे वाङ्मय पसरले होते, त्यांतील परिभाषानामक रत्ने अतिप्रयत्नाने शोधून काढून सोमदेवाने त्यांची कंठमाला बनविली आहे; ती वैद्य कंठगत करोत, असा भावार्थ आहे, हा अध्याय ( परिभाषेचा ) चोख समजून तडपाठ येत असावा असाच सोमदेवाचा आशय होय; ह्मणूनच तो लिहितो. भवेत्पठितवारोऽयमध्यायो रसवादिनः ।। रसकमाणि कुर्वाणो न स मुह्यति कुत्रचित् ।।

  • सोमदेवाच्या ‘रसेंद्रचूडामणि' नामक ग्रंथावरून बहुधा हा रसपरिभाषे आठवा अध्याय * रसरत्नससुच्चयां ' त घेतला असावा. * संद्रचूडामणि' ग्रंथ अद्याप मला पाहण्यास मिळाला नाही. वर दिलेले उतारे ‘रसरत्नसमुच्चय ग्रंथांतीलच आहेत. सोमदेवाने अतिशय श्रमाने रसशास्त्राची परिभाषा, यंत्रादिकाचे वर्णन मुशी, भाते इ. साहित्यांचे वगैरे वर्णन समजाऊन सांगितले आहे,