पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण गुरूपासून अभिषेकानंतर रसांकुशी विद्या मिळून तिचा एक लक्ष जप झाल्यानंतर रससिद्धांचे स्मरण व पूजा करावीं; ह्मणजे रससिद्ध होते. नाहीं तर होत नाहींः-- अन्यथा यो विमूढात्मा मंत्रदीक्षाक्रमाद्विना ।। कर्तुमिच्छात सूतस्य साधनं गुरुवार्जितः ॥ नासौ सिद्धिमवाप्नोति यत्नकोटिशतैरपि । तस्मात्सर्व प्रयत्नेन शास्त्रोक्तां कारयेत्क्रियी ॥ इतक्या पूर्वतयारीने गुरूच्या मार्गदर्शनाखाली रसशास्त्रांत शिरकाव करावयाचा ! मग विद्या मिळाल्यानंतर तरी गुप्तच ठेवावयाची! कारण योग्य अधिका-यांशिवाय इतरांस ती सिद्धच होत नाहींः-- रसविद्या दृढं गोप्या पातुर्गुह्यमिवध्वं ॥ भवेद्वीर्यवती गुप्ता निर्वीर्या च प्रकाशनात् ॥ असो. ही रसशास्त्रीय प्रस्तावना झाली. । प्रकरण २४ वें. * रससिद्ध का होत नाहीं ?* रसाणेवच्या-आठराव्या पटलांत याविषयी असे लिहिले आहे कीं, मनुष्य विधिपूर्वक नीट समजून घेऊन साधन करीत नाहीं; उगाच शास्त्रांनां मात्र दूषण देतोः कथयेत्सर्वजंतूनां न मे सिद्धं रसायनम् । मनसा रससिद्धिस्तु तथा क्लेशो मया कृतः ॥ मया कृता द्रव्यहानिर्दुधिया मूढचेतसा ।। ईदृशं नेव जानाति विधिहीनं मया कृतं ॥ पापिष्ठो दूषयेच्छास्त्र आत्मकर्म न विदति । विधिहीनों रसो देवि । नैव सिद्धयत्कदाचन ॥ शास्त्रहीनस्य देवेशि ! नैव सिद्धी रसायने ।। अशुभैः कर्मभिः सद्यः संप्रदायेन सिध्यति ।। यस्य तुष्टः शिवः साक्षात् तस्य सिद्धारसायने ॥ १' दूषणे ' इत्यपि ।