पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ वै. ] पाच्याविषयी माहिती... १२१ शास्त्रांत शिरण्याचे मार्ग व अधिकार आहेत; त्या त्या प्रमाणे तिकडे जावें लागते. गुरूही तसे मिळणे सहसा दुर्लभ असते; अलीकडे भोंदुच फार झाले आहेत; पण भोंदूमुळे ख-या सिद्धांची किंमत कांहीं कमी होत नाहीं. उलटी ती वाढते. गुरूच्या अनुरोधाने व त्यांच्या संतोषानेच रसविद्या शिष्याने मिळवावी. तस्माद्भक्तिबलादेव संतुष्यति यथा गुरुः ॥ तथा शिष्येण संग्राह्य रसवद्याऽऽत्मसिद्धये ॥१॥ रससिद्धि प्राप्त होण्यापूर्वी रसलिंगार्चन, मंत्रसाधन, साहित्य संमेलन वगैरे कसे करावे याचे विस्तृत वर्णन ग्रंथांतून आढळते. ग्रंथांमधून वर्णन केल्याप्रमाणे साधकानें नित्य अर्चन करावेंः एवं नित्यार्चनं तन कर्तव्यं रससिद्धये ॥ रसलिंगाचा महिमा. रससिद्धी पूर्वी रसलिंगार्चनाचा महिमा फार वर्णिलेला आहे. रसलिंगार्चन घडल्याखेरीज़, व तत्साधक मंत्रीसद्धी झाल्याखेरीज, रसविद्या साधत नाहीं. रसलिंगाचा महिमा खालील श्लोकांनी व्यक्त केला आहेः-- लिंगकोटिसहस्रस्य यत्फलं सम्यगर्चनात् । । तत्फलं कोटिगुणितं रसलिंगार्चनाद्भवेत् ॥ १ ॥ ब्रह्महत्यासहस्राणि गोहत्या अयुतानि च । तत्क्षणाद्विलयं याति रसालिंगस्थ दर्शनात् ॥ २ ॥ स्पर्शना त्प्राप्यते भुक्तिरति नित्यं शिवादितं ॥

केदारादीनि लिंगानि पृथिव्यां यानिकानिचित् । तानि दृष्ट्वा तु तत्पुण्यं तत्पुण्यं रसदर्शनात् ॥ १ ॥ काश्यादि सर्व लिंगेभ्यो रसलिंगार्चनं शिवं । प्राप्यते येन ताल्लगं भोगारोग्यामृतप्रदं ॥ २ ॥ अशा प्रकारचे रसलिंग बनविण्यास पारा स्थिर व घट्ट बनवितां आला पाहिजे; तो गुरूशिवाय येणे शक्य नाहीं; ह्मणून प्रारंभीच गुरु लागतो. १६