पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण शिष्य कसे असावेत ? गुरुभक्ताः सदाचाराः सत्यवंता दृढव्रताः । निरालस्याः स्वधमज्ञाः सदाऽऽज्ञापरिपालकाः ॥ १ ॥ दंभमात्सर्यनिर्मुक्ताः कुलाचारेषु दीक्षिताः । अत्यंतसाधकाः शांता यंत्राराधनतत्पराः ॥२॥ इत्येवं लक्षणयुक्ता शिष्याः स्युः कार्य सिद्धये ॥ यांतील अनेक लक्षणांपैकी खालील लक्षणे लक्षांत बाळगण्याजोगी आहेत, ते ‘कुळाचारांत दीक्षित असावेत, अत्यंत यने करून साधक असावेत, मंत्रसिद्धीमध्ये तत्पर असावेत, व इतकेंही करून उतावीळ नसतां शांत असावेत. कुलाचार किंवा कुलमार्ग हा एक तांत्रिक गूढ मार्ग आहे. त्यांतील रहस्ये कळून मनुष्य अध्यात्मांत मंत्रशास्त्रयोगें अधिकारी झाल्या खेरीज, रसादिशास्त्रांतील सिद्धि त्यांस मिळतच नाहींत. सिद्धांचे हे रसशास्त्र अलीकडील Chemistry सारखें नाहीं. आध्यात्मिक योग्यता व अधिकार यांचे आत्म्यावर संस्कार झाल्याखेरीज या सिद्ध मार्गात शिरताच मुळी येत नसे, अशी शिष्यपयाची तयारी नसतां केवळ कसेतरी करून विद्या चोरून नेऊ म्हणून कोणी गुरूकडे राहिल्यास ती त्यास सिद्ध होत नसे. शरूंनीं अंतःकरणपूर्वक सांगितल्याशिवाय सिद्धि प्राप्त होत नाहीं. मणि, मंत्र व औषधे हीं गुरुतुष्टी वाचून चोरून मिळवू म्हणजे मिळवितां येत नाहींतः-- नास्तिका ये दुराचाराश्चुवका, गुरुतोऽपरात् ।। विद्यां ग्रहीतुमिच्छति चौर्यच्छद्मखलोत्सवात् ॥ १ ॥ न तेषां सिद्धयते किंचिन्मणिमंत्रौषधादिकम् ।। ति यदि मोहेन नाशयति स्वकं धनम् ॥ २॥ इहलोके सुखं नास्ति परलोके तथैव च ॥ गुरूशिवाय रसासाद्ध मिळवू गेल्यास धनाचा मात्र व्यर्थ ना .. पण विद्या कांहीं साधत नाहीं असे स्पष्ट सांगितलेले आहे. असे असूनही लोक व्यर्थ गुरूशिवाय किमयेच्या नादी लागून नाश पावतात. प्रत्येक