पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ वें. ] पाच्याविषयी माहिती. ११९ आयुक्रमांखेरीज अशा सिद्धि मिळत नाहीत; व पापी माणसांनी चुकून जरी असे प्रयोग केले तरी ते सिद्ध होत नाहींत किंवा त्यांचे भलतेच परिणाम होतात असेही कित्येकांचे अनुभव आहेत यामुळे रसशास्त्रांत शिरणाराची पूर्वतयारी कशी असावी, व गुरूही कसे असावेत, या विषयींच प्रथम नियम सांगितलेले असतात. साधारणपणे व्यवहारिक माणसांना या विद्येत अधिकारच नाह असे सिद्धार्चे मत असे. त्यांची मते सविस्तरपणे जरा पाहू. कोणत्याही गूढशास्त्रांत ( Evsoteric sciences ) सिद्धि मिळण्यास त्या त्या शास्त्राचे वाङ्मयही कळले पाहिजे, व त्यांतील रहस्ये जाणणाच्या अनुभवी गुरूचाही सहवास पाहिजे. शास्त्राध्ययन नुसते उपयोगी पडत नाहीं. त्याचा क्रम व परस्परसंबंध कळण्यासाठी त्या शास्त्रांतील रहस्यज्ञ गुरु लागतो. प्रत्येक शास्त्रांत कांहीं तरी क्रम असतो व तोच जाणून कार्य केल्यास सिद्धि मिळतेः न क्रमेण विना शास्त्र न शास्त्रण विना क्रमः ॥ शास्त्र क्रमयुतं ज्ञात्वा यः करोति स सिद्धभाकू ।। गुरु कसा असावा ? आचार्यों ज्ञानवान् दक्षो रसशास्त्रदिशारदः ।। मंत्रसिद्धो महावीरो निश्चलः शिववत्सलः ॥ १ ॥ देवीभक्तः सदाधीरो देवतायागतत्परः।। सवाझायावशेषज्ञः कुशलो रसकर्मणि ॥ २॥ एवं लक्षणसंयुको रसविद्यागुरुर्भवेत् ॥ सर्व विशेषणे स्पष्टच आहेत. गुरु रसशास्त्रांमध्यें निपुण असावा, मंत्र सिटी असावा, शिवपार्वतीचा भक्त असावा, देवतायागतत्पर असावा, : सर्व रसग्रंथांचे विशेष ( मर्म ) जाणणारा असावा, व रसकमत कुशल असावा. असाच मनुष्य रसविद्येत गुरु होऊ शकेल.