पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*११८ भारतीय रसायनशास्त्र. | [ प्रकरण त्या त्या मागचा शोध केला असतां कळून येईल. “ या जगांत अशक्य . असें कांहींच नाहीं, योग्य प्रयत्न करणारा मात्र पाहिजे,' असे या मागांतील लोकांचे मत असते. * जिनने पाया, उनने छपाया' अशी दुसरी एक यांची ह्मण आहे. हिचा अर्थ असा की ज्यांना ही विद्या मिळाली त्यांनी ती परिभाषेच्या दडपणाखाली दडवून ठेविलेली आहे. परिभाषेचें पटल ज्यांना भेदून याग्रंथांत गति मिळविता येते, त्यानांच ही विद्या साध्य होते. शिवाय, ही विद्या पंरपरेनेंच कळणारी असल्यामुळे ग्रंथांतून ऐन ठिकाणी काकचंडीश्वरादिकांनीं तर * या पुढची क्रिया प्रत्यक्ष गुरू कडूनच समजावून घ्यावी ' अशा मेखा मारून ठेविलेल्या आहेत. सारांश, रसशास्त्रांमधील रहस्यें जरी तदितर लोकांना कळण्याचा मार्गच नाहीं तथापि, साधारणपणे पाण्याविषयी रससिद्धांची माहिती, शोध व कल्पना काय काय होत्या हे त्यांच्या ग्रंथांतील उघड भागावरून कळून येणार आहे. सारी रसशास्त्र धुंडाळली तरी गुरुकिल्लया कांहीं पुस्तकांत नसतात; व त्या पुस्तकांत असणे शक्यही नाही, असे मला तरी वाटते. पारा व इतर धातू यायोगे केवळ देहसिद्ध व लोहसिद्धि करून प्रवृत्तिमागांतच सुख व संपत्ति भोगीत बसणे हेच रससिद्धांचे अंतिम प्राप्य असेल असे कित्येकांस वाटण्याचा संभव आहे; पण “ परोपकार । याशिवाय दुस-या कोणत्याही स्वार्थपर हेतूनी रससिद्धांनी या विषयांचा अभ्यास केला नाही. ते स्वतः मोठे विरक्त, ज्ञानी, ईशकृपा पावलेले, मंत्र व तपोनिष्ठ, पुण्याचे राशी, असे असत; व असे असल्याखेरीज व वैषयिक भोगांवरून मन उडून अध्यात्ममागत मन लागल्याखेरीज अशा सिद्धिही पण प्राप्त होत नाहींत. संसारिक तळमळीच्या माणसांस असे सिद्धही भेटत नाहींत, व अशा विद्याही प्राप्त होत नाहींत. अरण्यांत नेहमी फिरत असणान्या सिद्ध पुरुषांची एखाद्या पुण्यवान् व निर्विषय प्राण्यास क्वचित् गांठ पडते व तो कृतार्थ होऊन जातो. वनांतील चमकारक औषधांखेरीज व विशिष्ट तहेच्या एकांतिक व आध्यात्मिक