पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ वें. ] पान्याविषयी माहिती. ११७ काकचंडीश्वरीमत वगैरे होत. या ग्रंथांपैकीं कांहींतून व इतर कांहीं ग्रंथांतून, पाच्याविषयीं रससिद्धांनी पूर्वी काय झटले आहे, व त्याचा सद्यःकालीं काय उपयोग होण्याजोगा आहे, या विषयी मराठी जाणणाच्या लोकांस नीट कल्पना यावी एतदर्थ हा लेख लिहीत आहे. । पाण्याचे व इतर धातूंचे * रसवैद्यक' व 'रसायन, या दोन शास्त्रांत उपयोग आहेत. रसवैद्यकांतील पाण्याच्या उपयोगाला ‘देहासिद्धि' म्हणत; वरसायनां' तील पाण्याच्या उपयोगाला ‘लोहसिद्धि' म्हणत.देहासिद्धि म्हणजे पारा व इतर धातु हीं शुद्ध करून, त्यांची भस्में वगैरे करून, त्यांच्या योगें शरीरांतील सर्व प्रकारचे रोग हटवून आयुर्वृद्धीची परमाबघि करावयाची, किंबहुना * शरीर अजरामर ' करावयाचें ! लोहासद्धि ह्मणजे पारा व इतर अनेक धातु यांवर अनेक दिव्यौषधींची क्रिया करून, त्यांस संस्कार देऊन त्यायोगे रुपे व सोनें बनवावयाचे, यासच “ रसायन' किंवा * किमया' असेही ह्मणत. सारांश, रससिद्धांच्या डोळ्यांपुढे ही दोन इष्टे ( ideals ) असत. ( १ ) शरीर, वैद्यकरीत्या धातूंचे औषधी प्रयोग करून निरोगी करणे ( २ ) रुपे व सोने तयार करणे, या दोन्ही शास्त्रांत * रस' ऊर्फ पाण्याचे विशेष प्राबल्य माहात्म्य असे;व ह्मणूनच यासर्व शास्त्रास मिळून ' रसायनशास्त्र,' ऊर्फ रसशास्त्र सटलेले आहे. या शास्त्रांवरील ग्रंथांना ‘ रसतंत्र, रसागम, रसानगम' वगैरे ह्मटलेले असते. रससिद्धांपुढे वर लिहिल्याप्रमाणे जगाचे दैन्य ' ( रोगादिकांमुळे आलेले ) व * दारिद्य ' ही दोन्ही नाहीशी करावीत, एवढाच प्रश्न होता; त्यानीं आपापल्या मताने व शक्त्यनुसार या दोन्ही गोष्टींत । सिद्धि मिळाविली आहे. ही सिद्धि आपणास कशी मिळाली याच त्यांनी वर्णने लिहून ठेविलेली आहेत; पण ग्रंथांची भाषा पारिभाअषिक शब्दांनी भरलेली असल्यामुळे ग्रंथ गुरुकिल्लीवांचून कळत नाहीं. पाण्याचे ( व इतर धातूंचे ) देहसिद्धि व लोहासिद्धि याविषयांचे गुण अनुभवून पाहिलेले सिद्ध अद्यापि या भरतभूमीवर आहेत हे कोणासही