पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण यांशिवाय, नागबोधि, रत्नघोष वगैरे नागार्जुनाच्या वेळची मंडळी, नंदी वगैरे त्याच सुमारची मंडळी, अर्वाचीन काळांतील गोरक्ष, मत्स्येंद्र गहिनी इत्यादि नाथ, त्याच सुमारचे सिद्ध लक्ष्मीश्वर, ब्रह्मज्योतिर्मुनींद्र, मंथानभैरव, खर्वणाख्य लोकनाथ, सोमदेव, स्वच्छंद भैरव, गहनानंद नाथ, भव्यदत्तदेव, इत्यादिकांचा उल्लेख रसग्रंथांतून नाना ठाई। येतो. असो. | अनेक रसग्रंथांची यादी आह्मीं दुस-या एका प्रकरणांत दिली आहे, त्यांतील कांहीं ग्रंथ यांपैकीं कांहींचे असतीलही. प्रकण २३ वें. पाच्याविषयी आपल्या प्राचीन ग्रंथांत मिळणारी माहिती. • प्राचीनकाळीं भारतवर्षांत रसायनशास्त्राचे ज्ञान किती प्रगती पावलेले होते हे आम्ही मागें ( समा. वर्ष १ लें अंक ८ वा ) दाखविलेलेच आहे; तसेच त्या लेखांत रसशास्त्रावरील संस्कृतमधील कांहीं ग्रंथांचेही वर्णन दिलेले आहे. आजच्या लेखांत, कांहीं ग्रंथांच्या आधारें, पान्याविषयी आपल्याकडे काय माहिती मिळते, व आपल्या लोकांची पारदाविषयी काय कल्पना होती, या विषयी थोडेसे लिहावयाचे आहे. | वैद्यक व तांत्रिक लोकांचे लक्ष प्रथम पायाकडे व धातूंकडे लागले, तांत्रिक लोकांनी पूर्वी अनेक भौतिक शास्त्रांतील शोध इकडे लावले, सर्वात प्राचीन असे रसशास्त्राचे ग्रंथ तांत्रिक परंपरेतील आहेत. व त्यांत एक प्रकारचे गूढत्व असून ते एका चमत्कारिक तहेच्या परिभाषेने लिहि. लेले आहेत. तांत्रिक लोकांचे प्रथम इतर धातूंबरोबर पाच्याकडेही लक्ष लागले. उपलब्ध ग्रंथांपैकी पाच्याविषयी सविस्तर माहिती असलेले प्राचीन तांत्रिक ग्रंथ म्हटले भ्हणजे *रुद्रयामल, रसार्णव, रससिंधु, रसहृदय

  • "रुद्रयामल हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा असून तो सवालाखाचा आहे असे म्हणतात. यांत मंत्रशास्त्र, भूगर्भशास्त्र; धातूवाद, रसवाद, रसायन, इत्यादि अनेक अपरूप भाग आहेत असे ऐकिवांत आहे. शोधकांनी ह्या प्राचीन ग्रंथाचा पत्ता लावावा.