पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ वें..] इतर ग्रंथकार. ११५. लेले नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट होय. रामायणांतील उल्लेखावरून वाल्मीकीस या विद्येची माहिती होती हे मागे दाखविलेलेच आहे. त्याच वेळचे वसिष्ठ, मांडव्य, ऋष्यशृंग, इंद्रद्युम्न इत्यादिकही या विद्येत प्रवीण होते ह्मणून उल्लेख आहेत; ते उल्लेख जेथल्या तेथे आह्मीं दिलेले आहेत. त्यानंतर इतर कांहीं किरकोळ उल्लेख आढळले ह्मणून हैं। स्वतंत्र प्रकरण लिहावे लागले. जसे वाल्मीकीस तसेच व्यासासही ही विद्या माहीत होती असे खालील उल्लेखावरून दिसतें :- । एवं संजायते तार चंद्रकांतिसमप्रभ ।। अन्यथा नास्ति वचनं इदं व्यासोदितं यथा ॥ १ ॥ | ( रसरत्न प्रदीप ) व्यासांसच ही विद्या माहीत होती असें नाहीं तर भीम व अर्जुन यांसही ती माहीत होती; भीम व अर्जुन यांनी रसाचे तिर्यक्पातन करून घेण्याची क्रिया बहुधा शोधून काढलीः | रसाधो ज्वालयेदानं यावत्सूतो जलं विशेत् ।। तिर्यक्पातनमित्युक्तं सिद्धैर्भीमार्जुनादिभिः ॥ २ ॥ ( आयुर्वेदप्रकाश ) या उल्लेखांवरून रामायणीय व भारतीय काळांत रसविद्या आपल्यांत चांगलीच प्रसिद्ध होती असे वाटते. यामुळे गीतेतील. रसोऽहमप्सु कौंतेयया उद्गारांत भगवंताचा कटाक्ष * सर्व द्रवरूपी पदार्थात मी ( सर्वोत्कृष्ट असा ) रस ह्मणजे पारा आहे. असे ह्मणण्याकडेच असावा असे वाटू लागते. या शिवाय व्याडि हा रससिद्ध ह्मणून प्रसिद्ध होता; याचे रस सिद्धांत नांव असून गरुडपुराणाने त्याचा असा उल्लेख केलेला आहे:-- व्याडिर्जगाद जगतां हि महाप्रभावः । सिद्धो विदग्धाहततत्परता दयालुः ॥ ( रत्नप्रकरणांत )