पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण यांची आहे. या नऊ नाथांपैकच मत्स्येंद्र, गहिनी, जालंदर, नागनाथ इत्यादिकांची स्थानें नगरच्या पूर्वेस तुळजापुरापर्यंत ३०।३५ कोस लांबीच्या डोंगराळ प्रदेशांत बहुतेकांवर तुरबती असून मुसलमानी नांवें प्रचारांत आहेत. मत्स्येंद्रनाथ यांचे स्थान मढीनजीक सांबरगांवचे जंगलांत आहे; त्यास गंजपीर अगर मायबा ह्मणतात. मढी हा शब्द मठी याचा अपभ्रंश दिसतो. कान्होबा ऊर्फ कानीफनाथ हे कानफांटी गोसावी असून शैव होते. ते समाधिस्थ झाल्यानंतर त्या स्थानावर तुरबत्तीचा पगडा बसला, मढी येथील हल्लीच्या पुजा-याचे ( मुजावराचे ) घरीं हिंदु नाथपंथाची मुख्य खूण · शैली शिंगी ' असून ती गळ्यांत अडकवून हे पूर्वी भिक्षेकरितां फिरत असत. नवनाथ भक्तिरसांत कानीफनाथाचे स्थान, * मढी येथे असून मढीचे पाश्चिमेस डोंगरांत ( यास गर्भगिरी झटलें आहे ) नव नाथांनीं यज्ञ करून वृद्धेश्वर नामक शिवलिंगाची स्थापना केली असे सटलेले आहे. वृद्धेश्वराचे प्रसिद्ध लिंग अद्यापि त्या डोंगरांत आहे. कानीफनाथ समाधिस्थ झाल्यानंतर पुष्कळ दिवसांनी हल्लीच्या मुजावरांच्या हिंदुपूर्वजांनीं पैठण येथील सादतअल्लीने मुसलमान करून बादशहाकडून त्यांस मढी येथील मोकासा, साहोत्रा, वगैरे इनामांची सनद मिळवून दिली. सातअल्लीने इ. सन १३५० च्या सुमारास कानी फनाथास महंमदी दीक्षा दिलेली नसून, त्यांच्या नंतरच्या त्या स्थानच्या एका हिंदु पुजा-यास त्याने ती दीक्षा दिली, हे विसरता कामा नये. यावरून इ. स. १३५० हून कानीफनाथादि मंडळी प्राचीन तर होती हे निःसंशय सिद्ध होते. - प्रकरण २२ वे. * इतर ग्रंथकार. 4 ना दिलेल्या स्वतंत्र ग्रंथाशिवाय व ग्रंथकारांशिवाय इतर कित्येक ग्रंथकार या विद्येवरचे आपल्यांत होऊन गेले असे त्यांविषयी आलेल्या अनेक उल्लेखांवरून समजते. आज या लोकांचे स्वतंत्र ग्रंथ मात्र राहि,