पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ वें. ] मत्स्येंद्रादि नाथपंथीय मंडळी. ११३ समजल्याने हा ज्ञानेश्वर कालीन न होता, इ. स. ५६ चे सुमारास येतो. हा कालविपर्यास होईल, मत्स्येंद्र, गोरक्षादिकांचे ज्ञानेश्वरावरून काळ ठरून जातात. मग चर्पटी ज्याचा गुरु म्हणविला जातो तो भर्तरि कोण, असा एक प्रश्न उद्भवतो; पण यास एवढेच मानावे लागते की चर्पटीचा शिष्य भर्तरिनाथ हा प्रसिद्ध भतृहरि राजा नसून त्याहून भिन्न व अर्वाचीन कोणीतरी असावा; व अशीच परंपराही असल्याचे एकदां मला कै. ह. भ. प. भिंगारकरबुवा यांनी सांगितले होते. स्वात्मारामाने आपल्या हठयोगप्रदीपिकेंत ज्या महासिद्धांची यादी दिली आहे तींत मत्स्येंद्र, गोरक्ष वगैरेंची नावे आहेतः आदिनाथश्च मत्स्येंद्रो शंवरानंदभैरवः । चौरंगी मेघ गोरक्षा विरूपाक्षो बिलेशयः ॥ इत्यादि मत्स्येंद्रनाथ स्त्रीराज्यांत गढून गेला असतां गोरक्षनाथाने त्यास आपल्या कार्याची आठवण देऊन परत आणिलें, या कथेचा उल्लेख शांकरदिग्विजयांत तशाच एका प्रसंगाच्या ओघाने आलेला आहेः गोरक्ष एषोऽथ गुरोः प्रवृत्ति ।। | विज्ञाय रक्षन् बहुधास्य देहं ॥ निशांतकांतानटनोपदेष्टा । नितांतमस्याऽभवदंतरंगः ॥ ९-८४ ॥ नाथमंडळापैकी प्रत्येकाची सविस्तर हकीकत देणे हा कांहीं येथे उद्देश नाहीं. ज्यांचे रसग्रंथ असतील त्यांविषयी थोडेसे लिहावे एवढाच आहे; तथापि येथे कानीफनाथाविषयी माहिती जेवढी मिळाली तेवढी देऊन ठेवतः-- | मत्स्येंद्रादि नवसिद्ध अगर नवनाथ ज्या ज्या ठिकाणी बसून तपाचण करीत होते त्या त्या ठिकाणच्या त्यांच्या आसनांस समाधि समजून लोक पूज्य मानतात. हल्ली या समाधींवरून तुरबती आढळतात. मढी (ता. शेवगांव, जि. नगर) येथील तुरबत कानफनाथ ऊर्फ कान्होबा १५