पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण याचा कानफाटी अगर नाथसांप्रदाय असे. यांच्याजवळ या सांप्रदायाची चिन्हें ह्मणून शिंगी, शैली वगैरे असे नवनाथ भक्तिसारांतील सिद्धांच्या हकीकतीशीं सध्या आपणांस विशेष कर्तव्य नाहीं. मत्स्येंद्र गोरक्ष, गहिनी, चर्पटी वगैरे नाथ ज्ञानेश्वरापूर्वी थोड्या काळांत होऊन गेले. त्यांनीं कांहीं ग्रंथ वगैरे लिहून ठेविलेले आहेत की काय, व त्यांचे कोठे प्राचीन ग्रंथांत उल्लेख आलेले आहेत. एवढेच आज आपणांस पहावयाचे आहे. | मत्स्येंद्रनाथाचे सध्या दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ( १ ) मत्स्येंद्रसंहिता च (२) ज्ञानकारिका हे दोन्हीं ग्रंथ मला पाहण्यास मिळाले नाहींत तेव्हां याविषयी विशेष कांहीं लिहिता येत नाहीं. गोरक्षनाथाचे मात्र बरेच ग्रंथ आहेत, ते डावीकडे देतों. ( १ ) गोरक्षपद्धति र योगशास्त्र ) यांपैकी पहिले दोन ग्रंथ योग ( २ ) गोरक्षसंहिता । ( 3 ) सिद्भुसिद्धांतपद्धति वदति। विद्येवरचे असून ते छापलेलेही आहेत. ( ५ ) विवेकमार्तड । (५) किमयागिरि ? रसविद्या (पुढचे दोन वेदांतशास्त्रावरील असून (६) सिद्धिगोष्टी (हिंदींत अप्रसिद्ध आहेत. किमयागिरि ग्रंथाचा नरहरिमालूने उल्लेख केलेला वर दिलेलाच आहे. त्यांत इतर हकीगतीबरोबरच किमया ऊर्फ रसविद्येचीही माहिती होती, असे नरहरिमालू स्पष्ट लिहितोः–“असो हे ऐसी गोरक्षकथा । वदला आहे किमयागिरिग्रंथा । तेथे किमयाची स्थाने सर्वथा । सांगितली आहेत जीं ॥ २-१०३॥ स्वमुखें गोरक्ष वदला आहे कथन |त्या ग्रंथाचा आश्रय पाहोन । नवही योगी वर्णिले ग्रंथीं ।। १०५ ।। संशय आलिया किमयागिरि ग्रंथा । विलोकावें विचक्षणीं ॥ १०६ ।।' याप्रमाणे किमयागिरिचा उल्लेख आहे सिद्धगोष्टी हा ग्रंथ हिंदीतच आहे असे समजते. हाही रसशास्त्रावरचाच ग्रंथ होय. चर्पटीनाथाचा उल्लेख रसरत्नसमुच्चयकत्याने रससिद्धांत केलेला आहे. हा चर्पटीनाथ भर्तृहरि राजाचा गुरु होता असे कित्येक समजतात; असे