पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ वें. ] मत्स्येंद्रादि नाथपंथीय मंडळी. १११ तो आपल्या ग्रंथास लागू करून घेतलेला आहे; यावरून नित्य नाथानंतरचा हा ग्रंथकार दिसतो. प्रकरण २१ चें। ५ मत्स्येंद्रादि नाथपंथीय मंडळी. * रसरत्नसमुच्चयावर लिहितेवेळी आह्मीं ज्ञानेश्वराची गुरुपरंपरा दिलेली असून, नाथपंथीयांनी पूर्वी ज्या चार विषयांमध्ये वाकबगारी मिळविली ते दुस-या एका प्रकरणांत दिलेले आहेत. नाथसांप्रदायाच्या मंडळींनी आदिनाथ । |) ( १ ) ब्रह्मज्ञान ( २ ) योगसिद्धि, (३) मंत्र मत्स्येंद्रनाथ सिद्धि उर्फ शाबरी विद्या, व ( ४ ) रस गोरक्षनाथ गैनिनाथ (गहिनीनाथ) । सिद्धि-या चार विषयांत प्राविण्य संपादन केले निवृत्तिनाथ होते. मत्स्येन्द्रनाथाची शिष्यपरंपरा डावीकडे ज्ञानेश्वर दिलेली आहे. यांतील आदिनाथ ‘स पूर्वेषामपि गुरुः कालेनावच्छेदात् ' या न्यायाने जर सोडून दिला तर, मत्स्येंद्रनाथापासून ही परंपरा सुरू होते. मत्स्येंद्रादि नवनाथाची हकीकत नवनाथभक्तिसार व इतर कांहीं किरकोळ ग्रंथ यांतून मिळते. नरहारमालूने आपला वरील ग्रंथ शके १७४१ मध्ये रचला. या ग्रंथास त्याने गोरक्षनाथाच्या किमयागिरि नामक ग्रंथाचा आधार घेतलेला आहे, तकेंच नव्हे तर आपला ग्रंथ केवळ त्याचेच भाषांतर आहे असे तो ह्मणतो:- अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार । आहे गोरक्षाचा किमयागार। परी पालटानि भाषांतर ।। महाराष्ट्र अक्षरी रेखिला ॥ अध्याय ४०-१८४ ॥ या ग्रंथांत, पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे, खालील नऊ नाथांची चारैत्रे आहेत, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ जालंदरनाथ, कानफनाथ, चर्पटीनाथ, नागेशनाथ, भर्तरी उर्फ भरतनाथ, रेवणनाथ, व गहिनी ऊर्फ गैनीनाथ. या नाथांस सिद्धही ह्मणतात. हे नवनाथ नवनारायणांचे अवतार मानिले गेले आहेत,