पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण शुकेधनमहाराा यथा दहति पावकः । तद्वद्धातुगतः सूतो रोगान् दोषत्रयोद्भवान् ॥ ७ ॥ गुरुसेवां विना कर्म यः कुर्यान्मूढचेतनः ।। स याति निष्फलं कर्म स्वप्ने लब्धंधनं यथा ॥ ८ ॥ तस्मात श्रद्धापरं यस्य तस्य तत्फलं भवेत ।। विद्यां गृहीतुमिच्छति चौर्यकूटबलात् छलात् ॥९॥ न तेषां सिध्यते किंचित् सणिमंत्रौषधादिकं ॥ अथ ग्रंथातरात्संक्षेपतो नानाविधमनुभूतं कर्मकौतूहलाधिकारो लिख्यते. जयत्यमरवंदिता त्रिपुरसुंदरी देवता । विभोगविभवान्विता परमतत्वचिंतार्चिता ॥ उपाधिरहिता हित सकलशास्त्रानर्धारिता ।। प्रपंचपदवाचिता त्रिभुवनकमाता मता ॥ १० ॥ रसीचंतामणिनम रसरत्नप्रदीपकः ।। भविष्यत्येव वै ग्रंथः श्रीमती हस्त पुस्तकम् ॥ ११ ॥ ग्रंथकत्याचे नांव कोठेही कळून येत नाही, या ग्रंथाची वैद्यमंडळांत बरीच प्रसिद्धि आहे. यांतील प्रयोगही निवडक व चांगले आहेत असे ह्मणतात. ग्रंथकर्त्याने अनेक ग्रंथांतून अनेक प्रयोगांचा अनुभव घेऊन हा कर्मकौतूहलाधिकार लिहिला आहे असे झटले आहे, तसेच आपला हा रसरत्नप्रदीप ग्रंथ श्रीमंतांचे हस्तपुस्तक ( Hand Book ) होईल असे त्याने लिहिले आहे. खरोखरच या ग्रंथाची तशी योग्यता आहे. देहप्रयोग व लोहप्रयोग दोन्हीं यांत मोठे निवडक दिलेले आहेत. आमच्या हस्तलिखित प्रतीत एकंदर आठ अधिकार अगर उपदेश आहेत. यांत लोहप्रयोग बरेच आहेत; ग्रंथकाराने कित्येक क्रिया मिळविण्यासाठी फार खटपट व प्रयास केल्याचे दिसते; कारण, एके ठिकाणीं तो लिहितो विभ्रांता बहवो देशाः रसाश्च बहवः कृताः । लब्धस्तदा मया सुतो दारिद्यदलनः परः । याप्रकारे हा महत्वाचा ग्रंथ आहे. ग्रंथकर्त्यांचे नांव जरी कळत नाहीं तरी काळ कळण्यांस कांहीं हरकत दिसत नाहीं. प्रारंभींचे २।३ श्लोक नित्यनाथाचे वादिखंडांतीलच आहेत. चौथ्या श्लोकांत फरक करून