पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૦૮ भारतीय रसायनशास्त्र, [ प्रकरण पयोगाद् विंध्यवासी इति ।” या दोघांच्या टीकांवरून * औषधिसिद्धि हा शब्द ‘रससिद्धि' असाच आहे हे उघड होईल. * औषधसिद्धि' हा शब्द रससिद्धि' या अर्थी रुद्रयामलांतील गंधककल्पांतही उपयोजिलेला आहेः विधिहीने न सिध्यति मंत्राराधनमौषधं । कदाचिद्विधिहीनानां काले सिद्धिस्तु जायते ॥ | या श्लोकांत औषधसिद्धि' ह्मणजे “ रससिद्धी' च कां घ्यावी हें रससिद्धि का होत नाहीं ? या प्रकरणांत दाखविलेले आहे. | रस अगर रसायन सिद्धि असुरभवनांत विशेषेकरून असते अशी व्यासाची समजूत दिसते; पण वाचस्पतिमिश्र ह्मणतो कीं, असुरभवनच कशाला पाहिजे ? मांडव्यमुनिही रसासद्ध होऊन विंध्यवासी होऊन राहिला होता; ह्मणजे या भरतवर्षात होता, असा आशय या मांडव्याचा उल्लेख रसरत्नसमुच्चय कर्याने सत्तावीस रस सिद्धांत केलेला आहे;व याने लिहिलेल्या शास्त्राचा नागार्जुनाने आपल्या रसरत्नाकरांत उल्लेक केलेला आहे. तेव्हां मांडव्य हा प्रसिद्ध रससिद्ध होता यांत शंकाच नाही. मांडव्य हा वशिष्ठाचा शिष्य होय. वशिष्ठाने यास ज्योतिषशास्त्र व रखशास्त्र हीं शास्त्रे शिकविल्याप्रमाणे दिसते. वशिष्ठ, मांडव्य, इंद्रद्युम्न, ऋष्यशृंग, वगैरे रामायणकालीन व तत्पूर्वीचेही लोक रससिद्ध ह्मणून प्रसिद्ध आहेत तेव्हां खि. पू. दुस-या शतकांतील पतंजलीस हा रसयोग माहीत असल्यास त्यांत नवल नाहीं. पतंजलीचे ग्रंथ, ( स्त्रि. पू. १५० ) (१) योगसूत्रे. (२) महाभाष्य. ( ३ ) चकरावरील टीका. ( अनुपलब्ध ) ( ४ ) लोहशास्त्र, ( अनुपलब्ध ) या प्रमाणे पतंजलीनें ग्रंथ लिहिले होते. याहून कांहीं त्याचे अधिक ग्रंथ असल्यास, त्यांची माहिती संध्यां मिळत नाहीं.