पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• ३९ वें..] पतंजली. १०७ याच पतंजलीला पवनयोगाबरोबरच ( प्राणायामादिक) रसयोगाचेंही ज्ञान होते, असा साधारण समज आहे. चक्रपाणिग्रंथावरील टीकाकार शिवदास याने पतंजलीच्या लोहशाखांतून उतारे दिलेले आहेत. यावरून पतंजलीचे लोहशास्त्रही एकेकाळीं प्रसिद्ध होते हे कळून येईल. पतंजलीस रसायन सिद्धीचे ज्ञान होते अशी आलबिरुणीच्या वेळीही समजूत होती; कारण तो लिहितो:- | ** The author ( Patanjali ) adds to the three parts of the path of liberation a fourth one of an illusory nature, Called रसायन consisting of alchemistic tricks with various drugs, intended to reaeise things, which by nature are impossible.), | Alberunis India, I, p, 80. पतंजलीने रसासाद्ध अगर रसायन सिद्धीवर लिहिलेला एखादा स्वतंत्र ग्रंथ आलबिरुणीच्या वेळीं होता की काय नकळे! पण तसे तर कांहीं । दिसत नाहीं; कारण आलबिरुणी पतंजलीच्या ( योग ) ग्रंथाच्या चौथ्या पादाचा ( कैवल्यपादाचा ) वर उल्लेख करीत आहे; पण त्या कैवल्यपादांत तर रासायनिक प्रयोग दिसत नाहीत. मग हा काय घोटाळा आहे ह्मणून सूक्ष्मदृष्टया आम्ही पाहू लागलों; तो कैवल्यपादांतील पहिल्या सूत्रांत अनेक सिद्धींचा उल्लेख आहे. ते सूत्र असें:- जन्मौषधिमंत्रतपः समाधिजाः सिद्धयः । यांत पतंजलि सिद्धि किती प्रकारांनी मिळतात हे सांगतातः-( १ ) जन्मसिद्धि, (२) औषाधिसिद्धि (३) मंत्रसिद्धि (४) तपःसिद्धि (५) समाधिसिद्धि, यांत ‘रससिद्धि' कोठे आहे ? व्यासभाष्यांत * औषधी वर अशी टीका आहे की, “औषधिभिः असुरभवनेषु रसायने नेत्येवमादि यावर पुनः वाचस्पतिमिश्राची अशी टीका आहे. * औषधिसिद्धिमाह असुरभवनेषु इति । मनुष्यो हि कुतश्चिन्निमित्तादसुरभवनमुपसंप्राप्तः अपनीयभिरसुरकन्याभिः उपनीतं रसायनमुपयुज्य अजरामरणत्वमन्याश्च सिद्धीरासादयति । इहैव वा रसायनोपयोगेन । यथा मांडव्यो मुनिः रसो