पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ भारतीय रसायनशास्त्र. [ प्रकरण प्रकरण १९ वें.

  • पतंजली. * योगेन चित्तस्य पदेन वाचां । मलं शरीरस्य तु वैद्यकेन । योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां । पतंजालं प्रांजलिरानतोऽस्मि ।

भोजः- न्यायवार्तिक. पतंजलीने व्याकरणावर जसे महाभाष्य लिहिले, तसेच वैद्यकावर कांहीं ग्रंथ लिहिले अशी समजूत आहे. योगसूत्रेही याच पतंजलीची आहेत असे कित्येक मानतात. पतंजलीचा वैद्यकावरचा ग्रंथ म्हटला ह्मणजे चरकावरील भाष्य होय. या टीकेतील एक उतारा नागेश भट्टानें आपल्या लघुमंजूषेमध्ये दिलेला आहेः-**आप्तो नाम अनुभवेन वस्तुतत्त्वस्य कात्स्येन निश्चयवान्, रागादिवशादपि नान्यथावादी यः स इति चरके पतंजलिः ।” चक्रपाणीने चरकावरील आपल्या आयुर्वेददीपिका ' नामक टीकेंत पतंजलीला याप्रकारे प्रणति केलेली आहे:- पातंजल-महाभाष्य-चरकप्रतिसंस्कृतैः ।। मनावाक्कायदोषाणां हऽहिपतये नमः ॥ “अहिपति' अगर ‘फाणिपति' हे नांव पूर्वांच्या ग्रंथांत पतंजलीस लाविलेले आहे; क रण त्यास शेषाचा अवतार समजत असत; किंवा छंदःशास्त्रकार पिंगलाप्रमाणे योगसूत्रकार पतंजलीही कदाचित् नागजातीचा ग्रंथकार असेल. चक्रपाणीच्या मते पतंजलीने ( १ ) पातंजल ( योगशास्त्र) ( २ ) महाभाष्य, ( ३ ) चरकप्रतिसंस्कृति–हीं तीन पुस्तके लिहिली. चरकप्रति संस्कृत' या पदानें चरकाच्या टीकेच्या स्वरूपाचा चांगला बोध होतो. दृढ बलाने एकदां तर चरकाची संस्कृति केलेलीच होती. पतंजली ही टीका व प्रतिसंस्कृति अशी दोन कार्ये त्या ग्रंथांवर केली, असा बोध होतो. पतंजलीने नुसती टीका अगर भाष्यच करून न थांबता, दृढबला प्रमाणे चरकावर प्रातसंस्कारही केला, असे यावरून कळते. ४ करणे म्हणजे प्राचीन ग्रंथांचे संपादन करतेवेळी ती ती शास्त्रे अर्वाचीन शोधांचा वगैरे त्यांत समावेश करून कालानुगामी Upto clete बनविणे,