पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ १८. बॅ. ] - रससार. यावरून हा गोविंदाचार्य कोणी मूढज्ञातीमध्ये (१) उत्पन्न झालेला शिवपूजक असावा हे कळून येते. त्याची वंशावळ डावीकडे दिलेली सहदेवकाचार्य आहे. हा पुढे श्रीधरदेवाचाशिष्य बनला. याने सहदेवक मोविंदाचार्य अनुभव घेऊन हे फारच उत्कृष्ट शास्त्र निर्माण केलं. ) नंतर * जातिसारचतुर्द्विज' असा अभयापालाचा पुत्र वीरदेव याने जास्णेच्या अखेरपर्यंत रसविद्या गोविंदाचार्यास शिकविली. हा वीरदेव अंतर्वेदींत राहणारा असे. वीरदेवाच्या प्रसादाने गोविंदाचार्याला या शास्त्राचा अनुभव घेतां आला. यावरून श्रीधरदेव हा लौकिक गुरु होता असे वाटते. याप्रकारे वीरदेवाकडून विषयज्ञान व अनुभव मिळवित्यानंतर नाना रसग्रंथ पाहून, व बौद्धमतही तपासून गोविंदाचार्याने हा रससार ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची योग्यता, " या ग्रंथांत नाना मते ( Theories ) असून, शिवाय ह्या ग्रंथांत कर्माधिकारही ( Practice ) आहे; ह्मणजे हा ग्रंथ केवळ थियारोटकल नसून कर्मसंयुक्तही आहे. बाकीचे सर्व ग्रंथ • अक्रियापूरित आहेत. ह्मणून त्यांवरून कांहीं काम करता येत नाही. म्हणून उपपत्ति यांनी युक्त असलेला हा ग्रंथ दुर्लभ होय, असा कर्त्यांचा शेरा आहे. इतर शास्त्रे कशास पाहिजेत, इतर प्रयोग कशास पाहिजेत, एक रससार ज्यास कळतो तो “ वादिराज' होतो ह्यांत सर्व कांहीं विषय आहेत यांतील मात्र सर्व विषय कोठेच नाहीत. हे शास्त्र ज्याला त्याला देऊं नये हैं नीट जपून ठेवावे. * त्वरित फल मिळावे ' असें ह्मणणा-या उताविळ्या शिष्याला, व व्यसनयुक्त शिष्याला तर बिलकुलच देऊ नये. खरोखरच हा ग्रंथ, कर्ता ह्मणतो तितक्या योग्यतेचा आहे. हा ग्रंथ रसविद्येच्या मावळत्या काळांत तयार झालेला असल्यामुळे, व्यवहारांत प्रयोग करतेवेळी कोठे अडते, हे कर्यास नीट समजल्यामुळे त्याने व्यवहारिक भाग चांगलाच लिहिलेला आहे. असो. १॥