पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ वें । रससारे. प्रमाणांनीं गोविंदाचायांचा काळ आठव्या शतकांतला असें ठविल्याप्रमाणे होईल. रसहृदयकार गोविंदाचार्य शंकराचार्यांचे गुरु, व हैहयकुलांतील कामदेव ऊर्फ ‘मदन राजाने बहुमानित-अत एव आठव्या शतकांतले होते, याबद्दल आम्हांस तर बिलकुल शंका वाटत नाहीं. .. रसहृदयकार गोविंदाचार्य हे. रससारकतें गोविंदाचायीहून प्राचीनतर व भिन्न आहेत. रससारकर्ते भिक्षु' नव्हते ? ते बरेच अर्वाचीन आहेत, । श्रीमद्गोविंदाचायांनी संपूर्ण रसशास्त्र अवघ्या ९१२. आर्यात इतक्या झर्मिक आणि सुंदर रीतीने आणिलेले आहे की, खरोखर यास ** रसहदय ह्मणण्याला कोणताच हरकत नाहीं रसावद्येचे हे खरोखरच * हृदय आहे? रसविद्येचे गुण कोणत्या तरी ग्रंथांतून प्रथम कळावयाचें। असेल तर ते रसहृदयावरून कळेल, कारण तेथे रसविद्येचे हृदय आहे, असो, प्रकरण १८ ।

  • रेससार.

हाही ग्रंथ केवळ धातुवांद ऊर्फ रसविद्येवरचाच आहे. यांत एकंदर २४॥२९ पटल असून, एकंदर श्लोकसंख्या ८० वर आहे. रसहृदय कर्ते गोविंदभगवत्पूज्यपादांहून अगदी भिन्न व अर्वाचीन असे दुसरे कोणी गोविंदाचार्य रससारचे कर्ते आहेत. हा ग्रंथ १४ व्या किंवा १९ व्या शतकांत निर्माण झालेला दिसतो. ग्रंथकर्त्याने प्रस्तावना व उपसंहारामध्ये थोडीशी हकीकत दिलेली आहे. आपण कोण, व कां ग्रंथरचीत आहों, याचा त्यांत खुलासा आहे. ते लिहितातः आलोक्य सर्वशास्त्राणि अनुसूय यथास्थितं । खारासारं ससुद्धृत्य संक्षेपार्थगौरवात् ॥ ३ ॥