पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७३। भारतीय रसायनशा. [ प्रकरण भिक्षु गोविंदाचार्य यांचा सन्मान रसाचार्य व चंद्रवंशांत उत्पन्न होऊन हैहयकुलास आपल्या जन्मानें भूषित केलेल्या, किरातांच्या श्रमदन * नांवाच्या राजाने केला. त्याच्या विनंतीवरून गोविंदाचायने हैं। रसहृदयतंत्र रचिलें. या हैहयकुलांतील श्रीमदन राजाविषयी कोठे शिला लेखांतून वगैरे माहिती मिळते की काय, हैं आपण आतां पाहूं. डॉ. गर्दे यांनी आपल्या वाग्भटाच्या प्रस्तावनेत ( पृ. ६४) याच रसहृदयकत्याचा काळ ठरवितेवेळी खालील माहिती दिलेली आहेः| ** हे ( च ) गोवंदपूज्यपाद शंकराचार्यांचे गुरु असावेत असें कित्येक झणतात. तसे असल्यास त्यांचा काल ८ व्या शतकाचे सुमारास येतो; कारण शंकराचार्य इ. स. ७८८ त जन्मले असा इतिहास आहे व जरी कदाचित् सहृदयकर्ते गोविंदपूज्यपाद आचायच्या गुरूहून भिन्न मानिले तरी दुस-या आधाराने त्यांचा काळ तोच ठरतो. रसहृदयकत्याने आपल्या ग्रंथाच्या अखेरीस हैहयकुलांतील मदनराजाच्या सूचनेवरून तो ग्रंथ रचिला आहे असे ह्मटलें आहे ह्या हैहयकुलांती राजांची वंशावळ कनिंगह्याम साहेबांच्या आर्कियोलॉजिकल रिपोर्टात दिली आहे. ( See Archiolojical Survey Reports, ol. XVII, p. 78 ) त्यावरून असे दिसून येते की त्या वंशावळीत कामदेव' या नांवाचा राजा ८ व्या शतकांत गादीवर होता, व हाच रसहृदयक्ति ‘मदन' होय; कारण, अशा तन्हनें नांवांचा पर्याय देण्याचा प्रघात आढळतो व ‘मदन' या नांवाचा एकंदर वंशावळींत दुसरा कोणीच आढळत नाहीं. जर कनिंगह्यामचा ‘कामदेव व रसहृदयंकाराचा ‘मदन' ( हे दोघेही हैहयकुलांतलेच असल्याचे वर्णन आहे ह्मणून ) एकच असतील, तर दोन

  • श्रीसदन हा किरात लोकांवर राज्य करीत असे; पण तो चद्रवंशांपका हैहयकलांत उत्पन्न झालेला होता. याच हैहयकुलांत कार्तवीर्य सहस्रार्जुन निपजला होता.

• किरात नाथ' हे विशेषनाम नल्हे, त्याचा अर्थ फक्त ' किरातांचा राजा