पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/515

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंचांगशोधनाविषयी सविस्तर विचार मागे केलाच आहे. शोधनाचे तीन मार्ग तेथे (पृ. ४३८) दाखविले आहेत. त्यांतून कोणता मार्ग ग्राह्य याविषयी सर्वांनी विचार करून बहुमताने निर्णय ठरविला तर फार उत्तम होईल. परंतु तसे होणे कठीण. सर्व लोकांचे लक्ष अशा गोष्टीकडे लागणे अशक्य आहे. लोकांतील ज्ञात्यांनी बहुमताने निर्णय ठरविणे इष्ट आहे. परंतु तेही घडणे कठीण. या देशांतील सार्वभौम सरकार परधर्मी असल्यामुळे तें या कामांत पडावयाचें नाहीं. ह्मणून ज्योतिःशास्त्रज्ञ, एतद्देशीय राजे, आणि धर्मगुरु यांचेच काय ते या कामी मुख्य कर्तव्य आहे. या तिघांनी एक मार्ग ठरविला आणि त्याप्रमाणे ग्रंथ करविला ह्मणजे तो मार्ग प्रचारांत येईल. नाही तर ज्या ज्योतिध्यास जो मार्ग ग्राह्य वाटेल त्याप्रमाणे तो ग्रंथ करील. आणि लोकसंमत किंवा मुख्यतः ज्योतिःशास्त्रज्ञसंमत झाला व त्यास इतर गोष्टी अनुकूल झाल्या तर कालां. तरानें तो ग्रंथ ग्रहलाघवासारखा आपोआप प्रसृत होईल. परंतु यास विलंब लागेल. वेधशाळा स्थापन करून वेध घेऊन मग त्यांवरून जी ग्रहस्थिति येईल तदनुसार ग्रंथ केला तर फार उत्तम; परंत असें होण्यास शेंपन्नास वर्षे, निदान वीस पंचवीस वर्षे तरी पाहिजेत. संकेश्वरचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी वेधाचा काही प्रयत्न नुकताच सुरू केला आहे असे समजते. ही फार आनंदाची गोष्ट आहे. तो तसाच चालू ठेवून योग्य दिशेनें चालवावा. परंतु सध्या ग्रंथ करविला पाहिजे. या कामी शंकराचार्य व एतद्देशीय राजे आणि ज्योतिषज्ञ यांची कर्तव्ये मला अशी दिसतात. (१) इंग्रजी नाटिकल आल्मनाक किंवा फ्रेंच कालज्ञानपंचांग ज्या ग्रंथांवरून करितात त्यांच्या आधारें देशी भाषेत ग्रंथ करावा. ते ग्रंथ फार मोठे आहेत; परंतु त्यांचे ज्ञान झाल्याशिवाय नवीन ग्रंथाची उपपत्ति समजावयाची नाही. असा ग्रंथ झाल्यावर त्याच्या आधारे संस्कृत सिद्धांतग्रंथ आणि करणग्रंथ आणि सारणीग्रंथ आमच्या पद्धतीने करवाने (२) ग्रंथ झाल्यावर ते पढविण्यास काही विद्यार्थी कांहीं पगार देऊन ठेवावे. (३) सदरील ग्रंथाचे आधारें पंचांग करून ते काही वर्षे सार्वजनिक पैशानें छापवाने पंचांगशोधनाकरितां ग्रंथ झाला ह्मणजे जातकाचे काम झालेच. मग ज्याला जातकाचा नाद असेल तो ती शाखा पाहील. तिसरी गोष्ट जिज्ञासा, हीशिवाय सर्व व्यर्थ आहे. युरोपांत ज्योतिषशास्त्रवृद्धीस नौकागमन कारण आहेच. तथापि तसेच किंबहुना जास्त महत्वाचे कारण जिज्ञासा हे आहे. मनुष्याला आपली खरी यो ग्यता कळण्याला ज्योतिषज्ञानासारखे दुसरे साधन नाही झटले तरी चालेल तसे ज्ञान झणजे युरोपांत सांप्रत उत्तमावस्थेस आलेल्या ज्योतिषशास्त्राचेच पाहिजे त्यावर मराठीत कांहीं ग्रंथ झाले आहेत. परंतु ज्योतिषगणिताचे ग्रंथ झाले नाहीत आणि केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगीनाही.स्वतःच्या प्रयत्नाने शोध होऊन ज्ञान हो तें खरें ज्ञान. असें ज्ञान होण्यास वेधशाळाच झाल्या पाहिजेत. सांपत सामान जें शिक्षण मिळते त्यामुळे व त्याबरोबर थोडेबहुत ज्योतिषशिक्षण मिळते त्या आणि ज्योतिषग्रंथांस चालन पाहिजे असें पुष्कळांस वाढू लागले यामुळे राष्ट्राची अंतःकरणभूमिका बीजावापास संस्कृत झाली आहे. अशा आमच्या यंत्रादिकांची माहिती खेडेगांवांतल्या ज्योतिष्यांस करुन दो तिष्यांस करुन देण्याचा व