पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/513

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५२) सवाची समजूत होत गेली. यामुळे वस्तुतः तें अंतर थोड्या वर्षांचे असतां पुष्कळ वर्षांवर वांटले जाईल असेच बीजसंस्कार उत्पन्न होत गेले. यामुळे ते दीर्घकालोपयोगी झाले नाहीत व कोठे कोठे तर निरुपयोगीच झाले. यास मोठे उदाहरण वर्षाचें मान प्रथमपासून जे आले त्याची शुद्धता झालीच नाही, यामुळे सांप्रत पंचांगशुद्धि करण्यांत मोठे कोडें काय ते वर्षमान शुद्ध करणे हे आहे. ब्रह्मगुसास विषुव दिवस मागें आला असे दिसून आले असतांही जितका मागे आला तें मान वस्तुतः सुमारें आर्यभटापासूनचे झणजे सुमारे १५० वर्षांचे असतां कलियुगारंभापासून इतकें अंतर पडले अशी त्याची परंपरागत समजूत झाल्यामुळे तें ३७०० वर्षांवर त्यानें वांटून दिले. नाही तर ब्रह्मगुप्तानेच सायन वर्षमान प्रचारांत आणलें असते. व एकदा त्याने आणलें असते ह्मणजे आज त्याबद्दल इतके प्रयास पडते ना. केशव, गणेश यांचे वेधही असेच फार थोड्या उपयोगाचे झाले. त्यांस स्वतःचे वेध ताडून पाहण्यास मागचे वेध असते तर फारच उपयोग झाला असता. सारांश ग्रंथांस बीजसंस्कार वेळोवेळी होत आले तरी तत्कालापुरती ग्रहशुद्धि झाली. आपले प्राचीन ग्रंथ अपौरुष आहेत आणि अगदी पूर्ण आहेत, ही समजूत व त्यामुळे आर्यभट, ब्रह्मगुप्त यांचे ग्रंथ पौरुष असतांही त्यांच्या ठिकाणी अपौरुषग्रंथांप्रमाणे झालेली पूज्यबुद्धि ज्योतिःशास्त्रवृद्धीस मोठी घातक झाली. ग्रहस्थिति अनुभवास मिळेनाशी झाली तर तेवढ्यापुरती थोडीशी शुद्धि करावी, आणि तीही मूळग्रंथाचे बीज या नांवानें, स्वतंत्रपणे नव्हे, आणि याहून आपलें जास्त कर्तव्य कांहीं नाहीं, अशी समजूत झाली. यामुळे आणि राजाश्रयाने दीर्घकाल चालणारे वेध. प्रयत्न बंद झाल्यामुळे युरोपखंडांतल्यांप्रमाणे नवीन शोध इकडे काहीच झाले नाहीत. राजाश्रयाने चालणारी वेधपरंपरा बंद होण्यास तरी आपली इतिकर्तव्यता फारशी राहिली नाही, ही ज्योतिष्यांची जी समजूत तीच बरेच अंशी कारण झाली असली पाहिजे. ज्योतिषी आपल्या कर्तव्याविषयी जागृत असते तर राजाश्रय मिळता. मुसलमानांचे प्राबल्य झाल्यामुळे एतद्देशीय मोठे राजे दक्षिणेत शक १३०० च्या पुढे व उत्तरेस त्याच्याही अगोदर फारसे कोणी राहिले नाहीत, आणि देशांतली स्वस्थता मोडली, हाही एक मोठा प्रतिबंध ज्योतिःशास्त्राभिवृद्धीस झाला. तो झाला असूनही कोकणांतलें नांदगांव, गोदावरी काठचें पार्थपुर, गोलग्राम, अशा अनेक खेडेगांवांत व काशी एथील विद्यापीठांत,केशव आणि गणेश यांसारखे वेधकार,कमलाकरासारखे उपपत्तिवेत्ते, पद्मनाभासारखे यंत्रकार, व्यक्तिशः झाले हे आमच्या लोकांस भूषणास्पदच होय. मराठे व पेशवे यांच्या कारकीर्दीत या प्रांतांत थोडीशी स्वस्थता होऊन नष्ट झालेली वेधपरंपरा चिंतामणि दीक्षितासारख्या (पृ. २९७, ३५२) यंत्रकारांनी पुनः स्थापित होत आहे, आणि अंशतः ग्रहलाघवासारख्या ग्रंथांनी व अंशतः इतर कारणांनी नष्टप्राय झालेले उपपत्तिज्ञान लघुचिंतामाणटीकाकार यज्ञेश्वर यांच्यासारख्यांनी पुनः स्थापित होत आहे, तों पेशव्यांची सत्ता नष्ट झाली. दिल्ली, उज्जनी, जयपूर, अशा स्थळी जयसिंहासारख्यांनी मोठ्या मानावर उभारलेले प्रयत्न राजकीय स्वस्थतेच्या अभावामुळेच बंद पडले, असे दिसते. सांप्रत इंग्लिश सत्ता झाल्यापासून स्वस्थता आहे;