पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/512

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५२०) शब्द आहेतच. हेलि इत्यादि सहा शब्द ग्रहांचे वाचक आहेत. परंतु त्यांसही संस्कृत शब्द आहेत. आणि ग्रहांचें ज्ञान स्वतंत्रपणे आह्मांस झाले ह्याविषयी वाद नाही. रिफ, यून, इत्यादि ११ शब्द कुंडलीतल्या स्थानांचे वाचक आहेत. परंतु त्यांस संस्कृत पर्याय आहेतच. लिप्ता शब्द गणितांतला आहे आणि त्याला कला हा संस्कृत शब्द आहे. बाकी होरा, द्रेष्काण, सुनफा, अनफा, दुरुधर, केमद्रुम हे सहा शब्द राहिले. ह्यांस मात्र संस्कृत पर्याय शब्द नाहींत. सुनफा इत्यादि चार योग आहेत, ते आह्मीं ग्रीक ग्रंथांतून घेतले असावे असे दिसते. परंतु त्यांत कांहीं महत्व नाही. आमच्या ग्रंथांत असे दुसरे शेकडो योग आहेत; तसे सुनफा इत्यादि चार योग यावनी ग्रंथांत घेण्याजोगे दिसले ते आह्मीं घेतले. होरा आणि द्रेष्काण हे मात्र बरेच महत्वाचे शब्द आहेत. तथापि जन्मलग्नकुंडलीचे सर्वस्व या शब्दांत आहे असें नाहीं. आमची द्रेष्काणपद्धति खाल्डी लोक आणि इजिप्तचे लोक यांजहून काही भिन्न आहे असें कोलबक ह्मणतो. परंतु तिघांचें कांहीं साम्य आहे, आणि द्रष्काण शब्द मूळचा संस्कृत नव्हे, यामुळे त्याला त्याचे महत्व वाटून जातक मूळचे आमचे नव्हे असें त्याचे मत झाले असे दिसते. परंतु एवढ्यावरून त्याचे मत बनले असेल तर तें चुकीचे आहे. होरा आणि द्रेष्काण यांची जातकांत सर्वत्र फार जरूरी आहे व त्यांचे फार महत्व आहे असें नाही, हे जातकाची ज्याला सविस्तर माहिती आहे त्याला सहज समजेल. त्या दोहोंचे मिळून महत्व शेकडा पांचाहून कमी आहे. तेव्हां एकंदरीत पाहतां ३६ यावनी शब्द आमच्या ग्रंथांत आहेत तरी त्यांवरून जातक मूळचे आमचे नव्हे असें सिद्ध होत नाहीं. सारांश जातकस्कंध मूळचा आमचा आहे. त्यांत कांहीं यवनी पद्धति मागाहून आली एवढाच काय तो आमच्या जातकस्कंधाशीं यवनांचा संबंध आहे. आमच्या ज्योतिःशास्त्राची वृद्धि कसकशी होत गेली हे मार्ग दाखविलेंच आहे. वराहमिहिराच्या पूर्वीचे आणि ब्रह्मगुप्तापासून राजमृगांकापूर्वापर विचार.. पर्यंतचे गणितग्रंथ उपलब्ध होतील तर त्यांवरून आमच्या ज्योतिःशास्त्राभिवृद्धीचा अधिक इतिहास कळून येईल. संहितास्कंधामध्य नवीन शोध होण्याचे वराहमिहिरानंतर लवकरच बंद पडले. गणितस्कंध सुमारें शके १००० पर्यंत वृद्धिगामी होता. भास्कराचार्याच्या ग्रंथांनी बहुतेक तत्पूर्व ग्रंथ मागें पडले आणि तेव्हापासून भास्करग्रंथांतील उपपत्तिज्ञान हेच ज्योतिःशास्त्रज्ञानसर्वस्व होऊन गेलें. ग्रहस्थिति दृग्विसंवादी होऊ लागली तेव्हां सूर्यसिद्धांतबीजकल्पक कोणी एक, * आणि केशव दैवज्ञ आणि गणेश दैवज्ञ हे उत्पन्न झाले आणि त्यांनी ग्रहस्थिति शुद्ध केली. तथापि ज्योतिःशास्त्र सतत वृद्धिगामी स्थितीत ठेवण्याचे काम त्यांच्याने झाले नाही. वेध लिहून ठेवण्याची परंपरा नसल्यामुळे बीजसंस्कार तत्कालापुरते झाले व तेही कोठे कोठे सूक्ष्म झाले नाहीत. व त्यामुळे दुसरी एक मोठी न्यूनत्वाची गोष्ट अशी झाली की, वेधानें ग्रहास में अंतर दिसेल तें कलियुगारंभापासून पडले अशी * हे कोणीं कल्पिलें हे समजत नाही.