पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/511

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ५१९ ) यांश), द्रेष्काण (राशीचा तृतीयांश); श्लोक १५ रिफ (कुंडलीतले १२ वें स्थान); श्लोक १६ यून (सातवें स्थान); श्लो.१७ केंद्र (१,४,७,१० ही स्थाने) श्लो. १८ पणफर (२,५,८,११ ही स्थाने), अपोक्लिम (३, ६, ९,१२ ही स्थाने), हिबुक (चवथें स्थान), यामित्र (सातवें स्थान, ) त्रिकोण (पांचवें स्थान), मेषरण (दहावें स्थान ); श्लोक २० वशि ( सूर्य ज्या स्थानी असेल त्याच्या पुढचें). अध्याय २ श्लोक २ हलि (सूर्य), हिम्न अथवा हेम्न (चंद्र), आर (मंगळ ), कोण ( शनि); श्लोक ३ आस्फुजित् (शुक्र). अध्याय १३ श्लोक ३ सुनफा, अनफा, दुरुधर, केमद्रुम, (रवि खेरीज करून बाकी एखादा ग्रह चंद्रापासून दुसऱ्या स्थानी असतां सुनफा, द्वादशस्थानी असतां अनफा, आणि या दोन्ही स्थानी दोन ग्रह असतां दुरुधर असे योग होतात. तिहींपैकी एकही योग नसला तर केमद्रुम योग होतो.). अध्याय ७ श्लोक १० लिप्ता (कला) हा गणितांतला शब्द आहे हे ३४ शब्द झाले. आणखी ज्यौ आणि द्युत हे शब्द आहेत असें ह्मणतात. परंतु द्युत अथवा द्यूत हा शब्द मला कोठे आढळला नाहीं; असल्यास तो एखाया स्थानाचा वाचक असावा. ज्यौ हा शब्द अध्याय २ श्लोक ३ यांत आहे असा वेबरचा आशय दिसतो. परंतु त्या श्लोकांत तो शब्द नाहींच; 'ईज्य' असा शब्द आहे; परंतु तो 'गुरु' या अर्थी संस्कृत शब्द प्रसिद्ध आहे. उत्पलाने तो 'ईज्य । असाच घेतला आहे. इत्थम् हा शब्दही उत्पलाने संस्कृतच 'याप्रमाणे या अर्थी घेतला आहे. कुलीर हा प्रसिद्ध शब्द संस्कृत आहे. हृद्रोग, त्रिकोण, हेम्न, कोण हे शब्द ग्रीक मात्र आहेत, संस्कृत नाहीत, असें ह्मणतां येणार नाही. असो हे सर्व ग्रीक झटले तरी यांत काय मोठा बाऊ आहे हे मला कळत नाही. बारा घरांची कुंडली हा पदार्थच आमचेकडे नव्हता, तो आह्मीं ग्रीकांपासून घेतला, असें या शब्दांवरून मानलेच पाहिजे असें कांहीं होत नाही. कुंडलीची कल्पना आमच्या देशांतच निघाली हे प्रथम दाखविलेंच आहे. आणि ते खरे असेल तर इतके यवनी शब्द आमच्यांत असले ह्मणून त्यांत कांहीं महत्व नाही. जातकाचे यवनी ग्रंथ आमच्या देशांत बरेच प्रचारांत होते, एवढे मात्र त्यावरून सिद्ध होईल. ते ग्रंथ प्रचारांत असल्यामुळे त्यांतले शब्द आले. हल्लीं 'बुक' हा इंग्रजी शब्द आमच्यांत आला आहे. परंतु तो येण्याच्या पूर्वीपासूनच तद्बोधित पदार्थ आमच्यांत आहे, आणि त्याला पुस्तक इत्यादि शब्द आहेत. तर मग बुक शब्द आमच्यांत हल्ली फार प्रचारांत आला आहे, आणि न जाणो काही दिवसांनी त्याचे अतिप्राबल्य होऊन पुस्तक इत्यादि शब्द ग्रंथांत मात्र राहतील, तरी त्यावरून पस्तक या पदार्थाची कल्पना मूळची आमची नव्हे असें सिद्ध होणार नाही. असेंचरील ३६ पैकी बहुतेक शब्दांचे आणि तद्बोधित पदार्थांचे आहे. त्यांत आणखी असें की, एका शब्दाबद्दल अनेक पर्यायशब्द असले झणजे त्यांतला सोईस पटेल तो पद्यांत येतो. त्याप्रमाणेच वरील ३६ पैकी पुष्कळ शब्द छंदाच्या सोईसाठी पद्यांत घातले आहेत. पुष्कळ ठिकाणी त्यांचे संस्कृत पर्यायही आहेत. ३६ पैकी मेष इत्यादि १२ राशींचे वाचक १२ शब्द आहेत; परंतु तद्वाचक दुसरे संस्कृत हे शब्द बृहज्जातकांत आणखी स्थानींही आले आहेत, परंतु त्यांची मुख्य स्थाने वर दिली आहेत; तसेच मख्य अर्थ वर दिला आहे. क्वचित दुसरा अर्थ होतो तो व सनफा इत्यादि बद्दल सविस्तर वर्णन पाहिजे तर बृहज्जातक सटीक पहावें.