पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/510

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१८) शकापूर्वी सुमारे ५०० वर्षांचा, निदान टालमीपूर्वी ५० वर्षांचा आहे, असें मागें सिद्ध केलेंच आहे. तेव्हां ज्या काली ग्रीकांत जातकग्रंथच नव्हते त्या कालींच आमच्याकडे जातकांतला अति महत्वाचा लग्न शब्द होता, आणि जन्मलग्नकुंडलीचें जातकशास्त्र उत्पन्न झालेले होते. बृहत्संहितेत ग्रहचाराध्याय (अध्याय १०४) यांत ग्रहगोचरफलें आहेत. त्यांत अर्थातच पहिले स्थान चंद्रावरून आहे. त्या अध्यायांत मांडव्याचा उल्लेख आहे. मांडव्य हा अर्थात आर्ष ग्रंथकार होय. यावरून मांडव्याच्या ग्रंथांत चंद्रकुंडली मुख्य होती, किंवा तिचा विचार तरी केला होता असे दिसते. मेषादि १२ राशि प्रचारांत आल्यावर अथर्वज्योतिषांतील ९ स्थानांच्या चंद्रकुंडलीवरून १२ स्थानांच्या चंद्रकुंडलीची ( राशिकुंडलीची) कल्पना सुचणे अगदी साहजिक आहे. आणि त्याप्रमाणेच ओघानें जन्मलग्नकुंडलीची पद्धति पराशर, गर्ग अशा कोणी तरी ऋषीने काढिली हे उघड आहे. ती आमची पद्धति मग पश्चिमेस गेली आणि यवनग्रंथकारांनी इ. स. १५० नंतर तिजवर ग्रंथ केले. कारण टालमीच्या पूर्वीचा जातकग्रंथ नाहींच. त्यांनी ती कदाचित् कांहीं वाढविली असेल. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की, यवनेश्वर आणि वराह यांचा मतभेद उत्पलाने पुष्कल स्थली दाखविला आहे. सत्याचार्याचे मत वराहाने जागोजाग घेतले आहे. आणि तेच त्यास मुख्यत्वें ग्राह्य होते, असें बृहज्जातकावरून अगदी स्पष्ट दिसते. यवन हेच आयजातकग्रंथकार असते तर इतका मतभेद होता ना आणि इतर अनेक ग्रंथकारांपैकी यवन हा एक एवढीच योग्यता वराह त्यांची मानता ना. यावरून जातकाचे आद्यग्रंथकार यवन नव्हत. म्लेच्छा हि यवनास्तेषु सम्यक् शास्त्रमिदं स्थितं ।। नषिवत्तेऽपि पूज्यंते किं पुनदैवविद्विजः ॥ १५॥ बृहत्सं.अ. २. हा गर्गाचा श्लोक वराहाने घेतला आहे. यांत " यवनांतही हे शास्त्र चांगले आहे." एवढेच त्यांविषयीं गर्ग ह्मणतो. सगळे ज्योतिःशास्त्र आह्मीं प्रथम यवनांपासुन घेतलें असें या वचनावरून कोणी अनुमान करितात, परंतु ते चुकीचे आहे. ह्या श्लोकाचा पूर्वापर संदर्भ पाहिला असता त्यांत गणितस्कंधाचा काही संबंध नाही. आणि ज्योतिषगणित एवढेच ज्योतिःशास्त्र किंवा तीच ज्योतिषाची मुख्य शाखा असे आमचे लोक मानीत नाहीत. जातक आणि संहिता ह्याच मुख्य शाखा मानितात. संहिताशाखेचा तर यवनांशी संबंध नाही. यावरून वरील श्लोक जातकस्कंधसंबंधेच आहे. त्यांतील 'देववित् ' या शब्दावरूनही हे उघड आहे. आणि 'यवनांतही हे शास्त्र चांगले आहे, म्हणून ते म्लेच्छ असून पूज्य आहेत, मग देव जाणणारा द्विज पूज्य होय याविषयी काय सांगावें' असें त्या श्लोकांत आहे. यावरून सगळे जातकशास्त्र आह्मीं यवनांपासून घेतले असे होत नाहीं. यावनी संज्ञा आमच्या जातकग्रंथांत आहेत, यावरून आमचें जातकशास्त्र मूळचे यवनांचें असें अनुमान कोणी करितात. परंतु ती चुकी आहे. याविषयी विचार करं. बृहज्जातकांत सुमारे ३६ ग्रीक शब्द आहेत, असें वेबर, कर्न हे ह्मणतात. हे शब्द कोठे कोठे आहेत हे आणि त्यांचे अर्थ सांगतो. अध्याय १ श्लोक ८ क्रिय, तारि, जितुम, कुलीर, लेय, पाथेन (पाथोन ), जूक, कौM, तौक्षिक, आकोकेर, हृद्रोग, इत्थम् ही मेषादि १२ राशींची नावे आहेत; श्लोक ९ होरा ( राशीचा द्विती