पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/509

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१७) जातकस्कंध पाश्चात्यांपासून आह्मीं घेतला की काय याचा विचार करूं. या गोष्टीचे समाधानकारक विवेचन व्हिश आणि वेबर जातकस्कंध. यांनी केले आहे, असे व्हिटने ह्मणतो. तें मी पाहिले नाही. यामुळे त्यांचा या कामी अधिकार कितपत आहे, त्यांस साधनें किती होती, आणि त्यांचे मुद्दे कोणते हे मला माहीत नाही. परंतु यासंबंधे जी साधकबाधक प्रमाणे निघण्याजोगी मला दिसतात, तीच घेऊन मी याचा विचार करितों. बारा घरांच्या जन्मलग्नकुंडलीवरून फलें पाहण्याची जातकपद्धति फरमिकस माटरनस (इ. स. ३३६-३५४) या ग्रंथांत मात्र प्रथम आढळते. असें जेकोबी । ह्मणतो. त्यानंतर ती हिंदुस्थानांत आली असेल तर येण्यास निदान शेपन्नास तरी वर्षे पाहिजेत. तर तेव्हांपासून वराहा (इ. स. ५००) पर्यंत पन्नास पाऊणशे वर्षांत ६ आचार्य ग्रंथकार आणि ५ आर्ष ग्रंथकार जातकग्रंथ लिहिणारे झाले हे अगदीच संभवत नाही. तेव्हां या एकाच प्रमाणावरून जातक मूळचे आमचें हे निर्विवाद सिद्ध होते. टिट्राबिब्लास ( Titrabiblas) हा जातकग्रंथ टालमी. चा असें ह्मणतात; * किंवा अलमाजेस्ट फलग्रंथ टालमीचा असें ह्मणतात. परंतु याविषयी खात्री नाही. तें खरें मानले तरी टालमीचें जातक लागलेंच हिंदुस्थानांत आलें असें मानले तर त्याच्या वेळे (इ.स. १५०) पासून वराहापर्यंत ३५० वर्षे होतात. परंतु वराहापूर्वी सात आठशे वर्षे तरी जातकपद्धति आमच्याकडे असली पाहिजे असें मागें (पृ० ४८२) दाखविलेंच आहे. दुसरे असे की, अथर्वज्योतिषांत सांप्रतच्या जातकपद्धतीचे मूलतत्त्व आहे. त्यांत १२ बद्दल ९ मात्र स्थाने आहेत. नवांपैकी जन्म, संपत्, नैधन, ह्मणजे पहिले दुसरें व सातवें ही आणि द्वादश स्थान कुंडलीतील १२८ ही एकच होत. अथर्वज्योतिषांत जन्मापासून १०वें नक्षत्र हे कर्मनक्षत्र आहे. सांप्रतच्या पद्धतीत 10 वें हे कर्मस्थान आहे. नवांपैकी बाकीचीही १२ पैकी कोणत्याना कोणत्या स्थानांत येतातच. अथर्वज्योतिषांतील जातकपद्धति भृगूक्त मटली आहे. अथर्वज्योतिष मेषादिसंज्ञांपूर्वीचें ह्मणजे शकापूर्वी ५०० हून प्राचीन असें मागें (पृ.१००) दाखविलेंचआहे. यावरून शकापूर्वी ५०० याच्या पूर्वी जातकपद्धति आमच्या देशांत स्वतंत्रपणे होतीच. इ. स. पूर्वी ५०० च्या सुमारास राशिसंज्ञा आह्मीं कल्पिल्यावर किंवा त्या आमच्याकडे आल्यावर सांप्रतचे किंवा सांप्रतच्याशी बहुतेक सारखें असें स्वरूप त्या पद्धतीला आमीं दिलें असें सहज दिसते. त्यांत अथर्वज्योतिषांत जन्मकुंडलीचे पहिले स्थान चंद्रावरून आहे तें जन्मकालचे लग्न हे पहिले स्थान झालें, हा मुख्य फरक झाला. यासंबंधे एक फार महत्वाची गोष्ट अशी की, जातकांत लग्न याचा जो अर्थ आहे त्याच अर्थी लग्न हा शब्द वासिष्ठसिद्धांतांत आहे. जन्मलग्नकुंडली उत्पन्न झाली होती ह्मणूनच लग्न शब्द वासिष्ठसिद्धांतांत आला आहे, एरव्ही त्याचे कारण नव्हते. वासिष्ठसिद्धति

  • व्हिशने Trans. Lit. So. Madras १८२७ मध्ये व वेबरनें Indische Studien, II, पृ. २३६ वगैरे स्थली केले आहे असें व्हिटने झणतो. (सू. सि. भा. पृ. १७४)

+ वेबर, हिस्टरी इंडि. लिट. पृ. २५१. +सू. सि. भाषांतर पृ. १७४. परंतु व्हिटनेचीही याबद्दल खात्री नाही.