पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/508

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१६ )वाद आहे. ग्रीकांत टालमीखेरीज कोणी ६०६० विभाग करीत नाहीत. यापान आमच्यापासून टालमीने ती पद्धति घेतली हे उघड आहे. ग्रहास्थति मोजण्याचे आरंभस्थान रेवती हे मूळचे नव्हे. तेशक ४४४ च्या सुमारे झाल. इ० स० पूर्वी ५७९ च्या सुमारे अश्विनीत संपात होता असें मागें (पृ. १३९) दाखविले आहे. तेव्हां पंचसिद्धांतिकोक्त सिद्धांतांचे आरंभस्थान अथवा अश्विन्यादि त्यांच्या त्यांच्या रचनाकालापासून शक ४४४ पर्यंत डा० थीबोच्या ह्मणण्याप्रमाणेच स्थिर बिंदु नव्हता तर वसंतसंपाताचें स्थान हेच होते. वासिष्ठसिद्धांतासंबंधे तर ते स्पष्टच आहे. पोलिशाचा गणितारंभकाल कोणता हे पंचसिद्धांतिकेवरून समजत नाही. तेव्हां त्याचे वर्षमान निरयन वर्षमानाच्या जवळ जवळ आहे तरी त्याचे आरंभस्थान विषुवायनांशी जुळेल असेंच असले पाहिजे. आणि तो सिद्धांत फार दिवस प्रचारांत नव्हता यामुळे त्या वर्षमानामुळे त्यास कांहीं बाध आला नाही. मूलसूर्यसिद्धांतांत मात्र गणितारंभ कलियुगारंभापासून आहे. तो आणि त्यांतलें वर्षमान घेऊन सायनमेषींच त्याचें मेषसंक्रमण येण्याचा काल सुमारे शक ४५१ हे वर्ष येते (पृ.३३७). मूलसूर्यसिद्धांताचा रचनाकाल इतका अर्वाचीन नाहीं हे वराहाच्या लिहिण्यावरून उघड आहे. तो काल जितका जितका मागे असेल त्याप्रमाणे दर ६० व षांस सुमारे एक अंश इतकीचुकीत्याच्या विषुवायनांस पडेल.यावरून असे एक अनुमान होतें की वर्तमानकलियुगारंभ हा गणितारंभ मानणे ही गोष्ट व वर्षाचे मान ह्या दोहोंपैकी कोणती तरी गोष्ट मूलसूर्यसिद्धांतांत वराहाच्या वेळच्याहून निराळी होती. व ज्या गोष्टी वराहाने दिल्या आहेत त्या त्याच्या पूर्वी शेंदोनशे वर्षांत कोणी तरी तशा केल्या असे दिसते. कसेही असले तरी टालमीच्या ग्रंथांतली कोणतीही माने (आंक. डे) सूर्यसिद्धांतांत नाहीत, व टालमीचा सिद्धांत निदान शक ५०० पर्यंत आम. च्या देशांत आला नव्हता* असें स्वतंत्र प्रमाण सांपडतें (पृ.३४८), तर मूल सूर्यसिद्धांत केव्हांचा कां असेना, त्यांत भारतीय ज्योतिषाचे जे बहुतेक अंशी पूर्ण स्वरूप आढळतें तें त्यास ग्रीकांच्या साह्यावांचून आले होते. केंद्रानुसारी फलसंस्काराच्या तत्त्वाशिवाय जास्त काही महत्वाची गोष्ट आह्मीं ग्रीकांपासून घेतली असें मानावेच लागेल असें एकही प्रमाण आजपर्यंत कोणीही दाखविलें नाहीं. हे तत्त्व हिपार्कसच्या पूर्वी रणजे इसवीसनापूर्वी तिसन्या किंवा दुसऱ्या शत कांत ग्रीकांचा ह्या देशांत बराच प्रचार होता तेव्हां आले थापनाकाला असावें. ते येण्यापूर्वी ग्रहगतिस्थिति काढण्याची सामुग्री तयार झालेलीच होती. व ते तत्त्व आल्यावर पुलिशसिद्धांत झाला. पुढे रोमक सिद्धांत झाला. आणि पुढे आमच्या ज्योतिषपद्धतीला बहुतांशी पूर्ण स्वरूप मूल सूर्यसिद्धांतांत आले. मग ते शकारंभाच्या पूर्वी आले की नंतर काही वर्षांनी आले हे निश्चयाने सांगता येत नाही. संहितास्कंधाविषयी वादच नाही. त्यांत पदार्थविज्ञानशास्त्राच्या पुष्कळ शा खा आहेत. आणि तिन्ही स्कंधांत प्रथम विशेष लक्ष त्याकडे लागले असेल, असें साहजिक दिसते. आणि तो स्कंध आमचा आहे, हे आझांस भूषण आहे. * पुढेही तो जयसिंहापर्यंत केव्हाही आमच्या देशांत आल्याचे दिसत नाही.