पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/507

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१५) रविचंद्रमध्यमगतींचा विचार इ. स. पू. १४०० इतक्या प्राचीन कालींच (वेआमचे स्वतंत्र प्र दांगज्योतिषकालींच) आम्ही करू लागलो होतो. बाईयत्न. स्पत्य द्वादशसंवत्सरचक्र कश्यपादिकांच्या वचनांतून आहे; आणि ते नक्षत्रांवर आहे. अर्थात् त्याचा ग्रीकांशी संबंध नाही. यावरून गुरुभगणास सामान्यतः बारा वर्षे लागतात, हे आम्हांस फार प्राचीन काली समजलेलें आहे. आणि त्याप्रमाणे इतर ग्रहांविषयी समजले असले पाहिजे. आणि ते स्वतंत्रपणे समजलें होते हे पंचसिद्धांतिकेतील वासिष्ठ आणि पोलिश सिद्धांतांतल्या ग्रहगणितावरून उघड आहे. वृत्ताचे अंशकलादि विभाग ही कल्पना मूळची आमचीच असावी असें मागें मुख्यतः वेदांगज्योतिषविचारांत व इतरत्रही पुष्कळ वेळा दाखविलेंच आहे. मूलवसिष्ठसिद्धांताचा ग्रीकांशी मुळीच संबंध नाही. त्यांत अंशकलाविकला हे विभाग आहेत. ज्या काली ग्रीकांचा आमच्याशी संबंध होता असें मानण्यास जागाच नाही, त्या कालींच ग्रहांची स्थिति, त्यांचे वक्रमार्गित्व, व त्यांच्या युति, यांचा विचार आम्ही करीत होतों, असें महाभारत विचारांत आणि पहिल्या भागाच्या उपसंहारांत दाखविलेंच आहे. ग्रह उदय पावल्यापासून अमुक दिवसांनी अस्त पावेल किंवा वक्री किंवा मार्गी होईल, असे स्थूल नियम पंचसिद्धांतिकेंत आहेत. हल्लींच्या ग्रंथांतही ते असतात, परंतु ते महत्त्वाच्या रूपाने नसतात. पंचसिद्धांतिकेंत व खंडखायांत त्यांचे पुष्कळ माहास्य दिसते. आणि ते पूर्वपरंपरेस अनुसरून आहे हे उघड आहे. कारण ग्रहस्पष्टगतीची उपपत्ति बरोबर समजण्यापूर्वी असलेच नियम बांधण्याचा प्रयत्न साहजिकच झाला पाहिजे. व तो झाला होता असें महाभारतांतील त्यासंबंधी वारवार असणाऱ्या उल्लेखांवरून व पंचसिद्धांतिकेंतील तत्संबंधी नियमांवरून दिसते. सारांश रविचंद्रस्पष्टीकरण आणि ग्रहस्पष्टीकरण यांची साधने तयार करण्याचे आमचे प्रयत्न स्वतंत्रपणे झाले होते, असे अनेक प्रमाणांवरून दिसून येते. त्या साधनांस केंद्रानुसारी फलसंस्काराचे तत्त्व सहाय होतांच हिपार्कस आणि टालमी यांच्या प्रमाणेच स्वतंत्रपणे विचार होऊन मूलपुलिशसिद्धांत आणि मूलसूर्यसिद्धांत यांच्या रूपाने त्या प्रयत्नांचें फळ उदयास आले. केंद्रानुसारी फलसंस्काराच्या दिग्दर्शनाशिवाय दुसरे कांहींच ग्रीकांपासून आमांस मिळाले नाही असे मानिले तरच ग्रीक ज्योतिषगणित आणि भारतीय ज्योतिषगणित यांत जो भिन्नपणा जागोजाग आहे त्याची उपपत्ति होते. केंद्र हा शब्द संस्कृत असता आणि मयसूर्यसंवाद व यवनपुरापासून देशांतर ह्यांचे उल्लेख नसते तर ज्योतिषगणिततत्त्वाचे दिग्दर्शन भारतीयांपासून ग्रीकांस मिळाले असारे० बर्जेसप्रमाणेच माझा सिद्धांत झाला असता. यवनांपासून दिग्दर्शन मिळालें तें महत्त्वाचे आहे आणि त्याप्रमाणे आमच्या लोकांनी त्याची योग्यता मानिली आहे, आणि उघडपणें तें वर्णिलें आहे, हे त्या दिग्दर्शनावर स्वतंत्रपणे भारतीय-ज्योतिषगणितमंदिर उभारणाऱ्या भारतीयांस भूषणप्रदच आहे. टालमीच्या ग्रंथांत मात्र अंशाचे ६० भाग त्यांतील प्रत्येकाचे ६० भाग ही पद्धति आहे, यावरून टालमीपासूनच हिंदूंस ज्योतिषाचे सर्वस्व मिळाले आहे असें जेम्स बर्जेस ह्मणतो. परंतु टालमीच्या पूर्वीच्या वासिष्टसिद्धांतांत तो विभाग आहे; आणि त्याचे मूळ जे दिवसाचे घटीपळादि साठ साठ विभाग ते मूळचे आमचे आहेत हे