पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/506

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१४) आणि तदनुसार मंदशीघ्रफलें उत्पन्न होतात.केंद्र हा शब्द ग्रीक किंवा दुसन्या कोणत्या तरी परभाषेतला असावा. तो संस्कृत नाही असे दिसते. यावरून केंद्रानुसार ग्रहाच्या मध्यम स्थितीत अंतर पडतें' हे तत्त्व यवनांकडून आमच्याकडे आले असावें असे मला वाटते. हे तत्त्व पुलिशसिद्धांतांत प्रथम आढळते, आणि तो सिद्धांत हिपार्कसचा ग्रंथ इकडे येण्यापूर्वीचा हे मागें सिद्ध केलेंच आहे. तेव्हां हिपार्कसच्या पूर्वीच ते तत्त्व इकडे आले. हिपार्कसच्या पूर्वी प्रतिवृत्तपद्धतीचा आणि तिजवर अवलंबून असलेल्या वरील तत्त्वाचा ज्योतिषगणितांत उपयोग कोणी केला नव्हता, हे कोळबूक इत्यादिकांच्या अभिप्रायांत स्पष्टच आहे. परंतु प्रतिवृत्तपद्धति हिपार्कसच्या पूर्वी अपालोनियस ह्यानें मूळ कल्पिली असें कोलक ह्मणतो. ह्याप्रमाणे अपालोनियस किंवा दुसरा जो कोणी तिचा कल्पक असेल त्यापासून कोणत्या तरी द्वारा ती इकडे आली. अर्थात ती अपूर्ण होती आणि याच कारणामुळे आमच्या आणि ग्रीकांच्या प्रतिवृत्तादिपद्धतींत साम्य आहे तरी बरेंच वैषम्य आहे. पुलिशसिद्धांताचा वरील तत्त्वापुरता यवनांशी संबंध असेल. पुलिशांत भुजज्या आहेत त्या ग्रीकांपासुन आह्मीं घेतल्या नाहीत. कारण टालमीच्या ग्रंथांतही भुजज्या नाहीत. सारांश परकीयांपासून आमांस कांही मिळाले असल्यास ग्रीकांपासून किंवा कदाचित् बाबिलोनच्या लोकांपासून आह्मांस केवळ वर लिहिलेल्या नियमाचे दिग्दर्शन मिळाले; दुसरें कांही मिळाले नाही. वेधप्राप्त गोष्टी इत्यादि तपशीलवार माहिती मिळाली नाही. युरोपियनांस वाटते तितके आह्मी परकीयांवर अवलंबून नाही. परस्परांपासून बारीक माहिती परस्परांस मिळण्याच्या कामांत किती अडचणी आहेत याचा व्हिटने इत्यादि कोणीच विचार केला नाही. सांप्रत युरोपियनलोकांचे व आमचे संघटन सुमारे ३०० वर्षे आहे. त्यांत सांप्रत सुमारे ७५ वर्षे तर इतके आहे की याच्या सहस्रांशही प्राचीन कालीं नसेल. तर इतक्या काळांत आह्मीं युरोपियनांपासून ज्योतिष किती घेतले आहे ? पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात, इतकें सामान्य तत्त्व मात्र पुष्कळांस माहीत आहे. परंतु ग्रहगतीची चांगली उपपत्ति उच्च प्रतीचे शिक्षण ज्यांस मिळतें त्यांस मात्र काय समजत असेल ती खरी. इतरास तिचें कांहीं ज्ञान नाहीं मटले तरी चालेल. सांप्रतच्या ग्रहस्पष्टगत्युपपत्तीमध्ये जितक काठिण्य आहे त्यापेक्षां आमच्याव ग्रीकांच्या प्राचीन उपपत्तीमध्ये बरेच जास्त काठिण्य आहे हे निःसंशय आहे. बरे हे नुस्ते उपपत्तीविषयीं झालें. ज्यांस उपपत्ति समजते त्यांपैकी किती लोक ग्रहगणित करितात ? ज्यांस उपपत्ति समजते त्यांस हातानें ग्रहगणित करण्याची रीति समजेल, व ते तें करूं शकतील, हे खरे आहे. परतु सांप्रत युरोपियन ग्रंथांवरून ज्योतिषगणित करणारी माणसे आमच्या सर्व देशात दहापंधरांहून जास्त नाहीत, असें ह्मणण्यास हरकत नाही. यांतही गणितोपयोगा ग्रंथ आजपर्यंत आमच्या देशांत युरोपियन ग्रंथांच्या आधारे झालेला असा एकच केरोपंतनानांचा मात्र प्रसिद्ध आहे. या कालांत जर अशी स्थिति आहे तर ज्या काला ज्योतिःशास्त्रज्ञांची गांठ पडण्याचा फारच कमी संभव व भाषांतराच्या फार अड चणी असल्या पाहिजेत त्या प्राचीन काली यासंबंधे एकापासून दुसन्यास सूचना मात्र मिळणे यापलीकडे काही जास्त होणे संभवतच नाहीं.