पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/505

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१३) मंदफलसंस्कारपूर्वक चंद्रसूर्यस्पष्टीकरणाची आमची पद्धति हिपार्कसचा रोमक सिद्धांत इकडे येण्यापूर्वी झालेल्या पुलिश सिद्धांतांत आहे. यावरून ती हिपार्कसच्या पूर्वीच सिद्ध झालेली होती. तर मग आह्मीं ग्रीकांपासून घेतले तरी काय ? म्लेच्छा हि यवनास्तेषु सम्यक् शास्त्रमिदं स्थितं ।। या श्लोकावरून आह्मीं ज्योतिष यवनांपासून झणजे ग्रीकांपासून घेतले अशी कल्पना कोणी करितात. परंतु या वचनाचा संबंध मुख्यतः जातकाशी आहे हे पुढे जातकविचारांत दाखविले आहे. ब्रह्मगुप्ताच्या लिहिण्यावरून यवनांचा गणितग्रंथ असावा असे दिसते. परंतु तो उत्पलोद्धृत पुलिशसिद्धांत होय, आणि तो वराहानंतर शके ४२७ पासून ५५० पर्यंत केव्हां तरी झालेला आहे हे मागें दाखविलेंच आहे. आणि आमचें ज्योतिषशास्त्र मूलसूर्यसिद्धांतांत झणजे वराहापूर्वीच उत्तमावस्थेस आले होते. असें आहे तथापि पंचसिद्धांतिकेंत एका स्थळी यवनपुरापासून उज्जनीचे देशांतर आले आहे. रोमक नगरांत म्लेच्छावतार - रूपाने तुला ज्योतिषज्ञान देईन असें सूर्याने मयास सांगितले अशा अर्थाचा एक श्लोक (पृ. १७८) सूर्यसिद्धांतांत आढळतो. तसेच भूमिकक्षाद्वादशांशे लंकायाः प्राक्च शाल्मले । मयाय प्रथमप्रश्ने सौरवाक्यमिदं भवेत् ॥ शाकल्यब्रह्मसि० अ०१.. असें वाक्य* शाकल्यब्रह्मसिद्धांतांत आहे. आजपर्यंत कोणाही युरोपियनाच्या लक्षांत हे वाक्य आल्याचे आढळले नाही. तथापि निःपक्षपातपणे विचार करितांना त्याचा विचार केला पाहिजे. पृथ्वीच्या द्वादशांशावर ह्मणजे लंकेपासून ३० अशीवर पूर्वेस मय आणि सूर्य यांचा संवाद झाला असें यांत आहे. यांत 'पूर्वेस असें आहे, आणि ज्योतिषज्ञान भारतीयांस मिळण्याजोगें स्थळ पूर्वेस ३० अंशांवर मुळींच नाही. तेव्हां हे वाक्य विश्वसनीय नाहीं तरी सूर्यसिद्धांतांतल्या कथेस यावरून बळकटी येते. यावरून यवनांचा आमच्या ज्योतिषगणिताशी कांहीं तरी संबंध आहे असें मनांत येते. आणि दोघांची प्रतिवृत्तादिपद्धति बरेच अंशी सारखी आहे, यावरून त्या अनुमानास बराच आधार मिळतो. तथापि कोणतेही आंकडे आह्मीं ग्रीकांपासून घेतले नाहीत हे मार्ग दाखविलेंच आहे. तेव्हां एकंदर विचार करून पाहतां रेव्ह. बर्जेसच्या अनुमानाप्रमाणे असेंच अनुमान केले पाहिजे की "दोन्ही राष्ट्रांस परस्परांपासून कांहीं दिग्दर्शन मात्र मिळाले, आणि तेही फार प्राचीन काळी (माझ्या मते हिपार्कसच्या पूर्वी) मिळाले. कारण अर्वाचीन काळी हिंदूंनी ग्रीकांपासून काहीं घेतलें असें झणणे तर, घेतले काय, हे सांगण्याचे कठीण आहे. कारण दोघांच्या संख्या मुळीच मिळत नाहीत." आतां हे दिग्दर्शन कोणापासून कोणाला मिळाले याविषयी विचार करूं. केंद्र ही संज्ञा फार महत्वाची आहे. मंदशीघोच्चांपासून ग्रहाचें जें अंतर में केंद्र होय;

  • हे वाक्य वें. बा. केतकर यांनी मला कळविलें. मला शाकल्यब्रह्मसिद्धांताच्या निरनिराज्या तीन प्रतींत पहिल्या अध्यायाच्या १११ श्लोकापुढें खंड आढळला (पृ०३६५ टीप); परंतु केतकरांच्या प्रतीत त्यापुढे श्लोक आहेत आणि त्यांतच सदई लोक आहे.