पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/502

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०) " सूर्यसिद्धांत लाट याने केला, वासिष्ठसिद्धांत विष्णुचंद्राने केला, रोमक श्रीषेणाने केला आणि ब्रह्मसिद्धांत ब्रह्मगुप्ताने केला." पंचसिद्धांतिकेंतले वासिष्ठ, रोमक, ब्राह्म हे सिद्धांत अनुक्रमें विष्णुचंद्र, श्रीषेण, ब्रह्मगुप्त ह्यांनी केलेले नव्हत हे निर्विवाद आहे (पृ. १५६,१५२ पहा.). यावरून बेरुणीच्या या वाक्यांतले हे तीन सिद्धांत पंचसिद्धांतिकोक्त नव्हत. अर्थात् यांतला पुलिश हा देखील पंचसिद्धांतिकोक्त* नव्हे. चेरुणीने पुलिशसिद्धांतांतलीं मानें जेथे जेथे दिली आहेत तेथे तेथे ती उत्पलोद्धृत पुलिशमानांशी जुळतात; पंचसिद्धांतिकोक्त पुलिशाशीं जुळत नाहीत. आणखी फार महत्वाचे प्रमाण असे की, ब्रह्मगुप्ताचें एक वाक्य मागें (पृ. १५४) दिले आहे, त्यांत पुलिश निराळा आणि यवन निराळा असें आहे. पुलिश हे नांव संस्कृतांत नाही असें नाही. यावरून पंचसिद्धांतिकेंतील पुलिशाचा ग्रीकांशी काही संबंध नाही. उत्पलोद्धत पुलिशसिद्धांत वराहाच्या वेळी नव्हता. ब्रह्मगुप्ताने यवन मटला आहे त्याचाच तो असावा. आणि यावरून तो शक ४२७ आणि ४५० ह्यांचे दरम्यान केव्हां तरी झाला अस वा. मेषादि संज्ञा आणि विभाग याविषयी थोडासा विचार करूं. मेषादि संज्ञा मेषादि संज्ञा. आमच्या नव्हत याविषयी खात्रीचे प्रमाण नाहीं. क्रिय, तारि, इत्यादि ग्रीक संज्ञा वराहाच्या बृहज्जातकांत आल्या आहेत. तथापि त्या आणि मेषादि यांतून मूळच्या अमुक असें निःसंशय कसें ह्मणतां येईल ? मेषादिकांचे क्रिय, तावुरि इ० हे भाषांतर अमूं शकेल किंवा कियादिकांचें मेषादि हे भाषांतर असूं शकेल. तारकापुंजांस आकृतीवरून नांवें देण्याची कल्पना आमच्यांत आहे. मृगशीर्ष, हस्त, श्रवण ह्या नक्षत्रसंज्ञा आकृतीवरूनच पडल्या आहेत. तैत्तिरीय संहितेंतील नक्षत्रिय प्रजापति पूर्वी सांगितलाच आहे. हस्त आणि श्रवण यांचा प्रदेश फार लहान आहे असे कोणी ह्मणेल तर व्याधयुक्त सशीर्ष मृग आणि नक्षत्रिय प्रजापति हे तारकापुंज एका राशीहून मोठे आहेत. भारतांत आणि पाराशरसंहितेंत ब्रह्मराशि आला आहे. आणि त्यास प्र. त्यक्ष राशि ही संज्ञा आहे. तर मेषादि संज्ञा आमच्या लोकांनी कल्पिल्या नाहीत असें निश्चयात्मक कसें ह्मणतां येईल ? तथापि “ मत्स्यौ घटी नृमिथुनं सगदं सवीणं" इत्यादि राशिलक्षणें वराहाने दिली आहेत. त्यांस आधारभूत दुसरी वचने उत्पलाने यवनेश्वर आणि सत्य यांची मात्र दिली आहेत, आर्षवचर्ने दिली नाहीत; मेषादि राशीसंबंधे कथानकें पाश्चात्यांची आहेत, तशी आमच्या पुराणादिकांत नाहीत; आणि मेषादि राशि ह्मणजे क्रांतिवृत्ताचा बारावा भाग असा एवढाच आमच्या ग्रंथांत त्या संज्ञांचा उपयोग केलेला दिसतो. यावरून मेषादि संज्ञा मूळच्या आमच्या नसतील असें ह्मणण्यास जागा आहे. त्याविषयी खात्रीने कांहीं सांगवत नाहीं. तथापि हे लक्षांत आणले पाहिजे की नुसती वारपद्धति आणि मेषादि संज्ञा

  • पंचसिद्धांतिकोत सूर्यसिद्धांत लाटकृत नव्हे असें मागें (पृ. १६७ ) झटले आहे, त्यासही यावरून बळकटी येते.

यवनांचा आमच्या जातकाशी संबंध आहे तो मूळचा नव्हे हे पुढे दाखविले आहे.