पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/501

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०९) तली कोणतीही गोष्ट टालमीची व आमच्या सौरादि पांच सिद्धांतांची जुळत नाही. त्यांतली एकही गोष्ट आम्हीं टाल्मीची घेतली नाही, असे त्या त्या गोष्टीच्या विचारांत सिद्ध झालेच आहे. ह्या गोष्टी जुळत नाहीत तरी आमच्या ग्रंथांस . व मुख्यतः त्यांतील मंदशीघ्रफलांस टालमीचाच आधार आहे, असें थीबो ह्मणतोः व आंकडे जळत नाहीत याचे कारण त्याने असें काढिले आहे की, हिंदुलोकांनी सूक्ष्मतेकडे कमी लक्ष दिले ह्मणून आंकड्यांचा मेळ नाही. परंतु करणग्रंथांचा ज्याला परिचय आहे तो असें ह्मणणार नाही. आमच्या ग्रंथांत रवीचे उच्च ७५ किंवा ७८ किंवा ८० अंश आहे, आणि टालमीचे रव्युच्च ६५३ अंश आहे. हिपार्कसचेही इतकेंच असावें (पृ. २०६-९).६५।। चे कोणी ६५ किंवा ६६ करील. नऊ दहा अंशांचा फरक कसा होईल ? ज्योतिषगणिताची ज्यांना माहिती आहे त्यांना या एका गोष्टीवरून कबूल करणे भाग आहे की, थीबोच्या या कारणांत काही अर्थ नाही. एका ग्रंथांतील गतिस्थित्यादिकांचे अंक दुसऱ्या ग्रंथांत घेतांना आमचे लोक सूक्ष्मतेकडे किती लक्ष देणारे आहेत हे गणितस्कंधाच्या मध्यमाधिकारांत सर्व ग्रंथांचा संबंध मी दाखविला आहे त्यावरून दिसून येते. पंचसिद्धांतिका, ब्रह्मगुप्ताचे खंडखाय, भास्कराचें करणकुतूहल ही याबद्दल ठळक उदाहरणे आहेत. विकलेचीही कसर न सोडण्याविषयी आमचे ग्रंथकार जपणारे आहेत. टालमीच्या ग्रंथांतले रविचंद्र व पंचग्रह यांच्या गणिताचे विशेष प्रकार आमच्या ग्रंथांत नाहीत. टालमीच्या यंथांत ' ज्या ' आहेत, आमच्यांत ज्यार्धे आहेत. हा फरक फारच महत्वाचा आहे. ग्रीक ज्योतिषाचा पक्षपाती व्हिटने हाही ह्मणतो की, टालमीचा संबंध सूर्यसिद्धांताशी काही नाही. सारांश, पंचसिद्धांतिकोक्त सिद्धांत टालमीहून प्राचीन आहेत. इ. स. पूर्वी १५० व इ. स. १५० ह्यांच्या दरम्यान इसवी सनाच्या आरंभाच्या समारास रोमक सिद्धांत इकडे आला. बाकीचे सिद्धांत त्याहून प्राचीन आहेत. ते शकापूर्वी सुमारे दोनतीनशे वर्षे तरी झाले असले पाहिजेत, आणि ते होण्याची साधनें तर बरीच शतकें तयार होत असली पाहिजेत. या सिद्धांतांचा कालानुक्रमानें कम पैतामह, वासिष्ठ, पोलिश, सौर, रोमक असा दिसतो हे मार्गे सांगितले आहे. (पृ. १६८ ). वासिष्ठसिद्धांतांत मेषादि विभाग आहेत यावरून तो शकापूर्वी ५०० याहून प्राचीन असण्याचा मात्र संभव नाहीं; त्या सुमाराचा असण्याचा संभव आहे. तो अगदी अर्वाचीन मटला तरी टालमीहून ५० वर्षे तरी प्राचीन ह्मणजे शककालारंभाहन प्राचीन असला पाहिजे. कारण रामक सिद्धांत टालमीच्या पर्वी नुकताच इकडे आला ह्मटले तरी त्यापूर्वी पुलिश आणि वासिष्ठ हे होन सिद्धांत निदान ५० वर्षे तरी झालेले असले पाहिजेत. हिपार्कसचा रोमक इकडे येण्यापूर्वीचा पौलिश सिद्धांत आहे. मग तो शकापूर्वी ५०० पासून शकारंभापर्यंत केव्हाही झालेला असो. अलेक्झांड्रिया येथील पौलस याच्या नांवावरून पुलिशसिद्धांत हे नांव पहले असें बेरुणी* ह्मणतो, यावरून पुलिशसिद्धांत ग्रीकांपासून आला असे कोणी णतात. परंतु बेरुणीने हे ज्या स्थानी सांगितले आहे त्याच स्थानी तो ह्मणतो की * India, Vol. I. P. 153.