पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/503

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यांत काही अर्थ नाही. ग्रहस्पष्टगतिस्थितीचे ज्ञान व त्याचे प्रमेय ह्यांत कायतें ज्योतिःशास्त्राचे महत्व आहे. आह्मी प्रथम नुस्ते सावन दिवस (किंवा तिथि ) पहिला दुसरा असे मोजीत होतो त्यांबद्दल वार घेतले, किंवा क्रांतिवृत्ताच्या १२ विभागांस षडशीति इत्यादि संज्ञा आमच्या होत्या त्या टाकून मेषादि घेतल्या, यांत काही विशेष झाले असें नाहीं. क्रांतिवृत्ताचे १२ विभाग आमच्यांत मूळचे होते हे वेदांगज्योतिषविचारांत, पारस्करसूत्रविचारांत (पृ. १०१) आणि महाभारतविचारांत दाखविलेंच आहे. तसेच वृत्ताचे ३६० अंश आणि अंशाच्या ६० कला ही पद्धति मूळची आमचीच असावी हे वेदांगज्योतिषविचारांत दाखविलेंच आहे. ग्रहस्थिति राशिविभागांवर सांगण्याची पद्धति मात्र मेषादि विभाग प्रचारांत आल्यावर सुरू झाली असे दिसते. ग्रहस्पष्टगतिप्रमेय आह्मीं ग्रीकांपासून घेतले असले तरी ते वासिष्ठसिद्धांतांत नाही. अर्थात ते घेतले असल्यास त्यापूर्वीचा वासिष्ठसिद्धांत आहे, आणि त्यांत मेषादि विभाग आहेत. यावरून मेषादि विभाग खाल्डी लोक किंवा इजिप्तचे लोक यांजकडून आमचेकडे आले असले तरी ग्रहस्पष्टगतिममेय त्याबरोबर आले नाही.त्यानंतर बहुतेक स्वतंत्रपणे त्या प्रमेयाचे ज्ञान आझांस झाले असें पुढे दाखविले आहे. तेव्हां मेषादिसंज्ञा आणि विभाग आह्मीं खाल्डी किंवा इजिप्तचे लोक यांपासून घेतले असल्यास त्यामुळे आमांस कमीपणा आला असें मुळीच नाही. त्या संज्ञा इसवी सनापूर्वी ५०० च्या सुमारास आल्या हे मागें (पृ० १३९) दाखविलेंच आहे. आमच्या लोकांत वेधपरंपरा नाहीं, वेधकौशल्य नाही, अवलोकन नाही, हे आरोप मिथ्या होत असें दुसऱ्या भागाच्या आरंभी ग्रीकांपासून आम्हीं (पृ. १४९) व विक्षेपमानविचार (पृ. ३२४।२६) अयकाय घेतले ? नचलनविचार (पृ.३३३) आणि वेधप्रकरण (पृ. ३४११३५५) यांत व इतर पुष्कळ स्थळी मी दाखविलेंच आहे. परदेशांतले प्राचीनतम उपलब्ध वेध हटले तर खाल्डी लोकांचा इ. स. पूर्वी ७२० चे ग्रहण आणि ग्रीकांचा इ. स. पू. ४३० या वर्षी मेटननें केलेलें उदगयनावलोकन हेच होत. आणि आमी तर इ. स. पूर्वी १४०० या कालीं उदगयनावलोकन केले होते. पहिल्या भागाच्या उपसंहारांत ग्रहगतिस्थितीविषयी सांगितलेच आहे. त्यावरून आमच्या लोकांमध्ये ग्रहावलोकनप्रवृत्ति दिसून येते. वासिष्ठ आणि पौलिश ह्यांतील ग्रहस्पष्टस्थितिनियमांचे विवेचन मागें (पृ. ५०८) केले, त्यावरून आमचे लोक ग्रहांचे अवलोकन करून त्यांची स्थिति लिहून ठेवीत आणि तिजवरून नियम काढीत, हे कबूल केलेच पाहिजे. सारांश, वेधसिद्ध गोष्टी हिंदुलोकांस स्वतः काढितांच येणार नाहीत या ह्मणण्यांत कांही अर्थ नाही. आतां परदेशीयांपासून आह्मीं गणितस्कंधांत कांही घेतले आहे की काय हे पाहं. वर्षमान, ग्रहमध्यमगति, मंदोच्चे आणि पात, मंदकर्ण, विक्षेपमानें, अयनचलन, रविचंद्रपरममंदफलें व पंचग्रहांची परममंदशीघ्रफलें, कांतिवृत्ततिर्यकत्व, सूर्यचंद्रलंबन, उदयास्तकालांश, यांतून कोणतीही गोष्ट आह्मीं टालमीपासून घेतली नाही, असे त्या त्या गोष्टींच्या विचारांत सिद्ध झालेच आहे. हिपाकस यास रविचंद्रस्पष्टीकरण मात्र माहीत होते, ग्रहस्पष्टीकरण त्यास माहीत नव्हते;