पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/500

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५०८) मग वक्री होऊन १५ दिवसांत २ अंश चालतो. नंतर ५ दिवसांनी पश्चिमेस अस्त पावतो. नंतर दहा दिवसांनी पूर्वेस उदय पावतो. पुढे २० दिवसांनी मार्गी होतो. [ या तीन वेळी तो दर खेपेस ] चार अंश जातो. पुढे २३२ दिवसांत २५० अंश जाऊन पूर्वेस अस्त पावतो. पुढे ६० दिवसांत ७५ अंश जाऊन पश्चिमेस उदय पावतो." ह्यांत मंदशीघ्रफलां विषयी स्पष्ट कोठे सांगितले नाही इतकेच नाही, तर गर्भितही नाही. आकाशांत अनेक वेळा. शुक्रचार पाहून दिसून आलेले वरील प्रकारचे स्थूल नियम पंचसिद्धांतिकेच्या शेवटच्या अध्यायांत आहेत. संहिताग्रंथांत ग्रहचाराचा विचार असतो. त्यावरून व भारतादिकांवरून असे अनुभव घेण्याकडे आमच्या लोकांची प्रवृत्ति होती असें सहज दिसते. याबद्दल दुसरें विशेष प्रमाण असे की, गुरूच्या उदयावरून संवत्सराचा आरंभ करण्याची पद्धति पुष्कळच वर्षे प्रचारांत होती (पृ० ३८७) ती नक्षत्रांवर बसविलेली होती. अर्थात् ग्रीकांपासून कांहीं गणित घेतले असल्यास त्याच्या पूर्वीची ती होती. ती पद्धति गणितावर बसविलेली नव्हती, तर केवळ प्रत्यक्ष आकाशांत पाहून त्यावरून संवत्सर ठरवावयाचा अशी होती. अर्थात् त्या पद्धतींत गुरूच्या स्पष्टगतीचा अनुभव शेकडो वर्षे घेण्यांत आला असला पाहिजे. तेव्हां त्यावरून स्पष्टगतीचे आणि मध्यमगतीचे वरच्यासारखे नियम बांधले असतील इतकेच नाही, तर बांधणे भागच झाले असले पाहिजे, असे त्या पद्धतीचा पूर्ण विचार केला असतां सहज दिसते. सदई अध्यायांतलें गणित पंचसिद्धांतिकोक्त सौरसिद्धांताच्या अहगणादिकांशी जुळत नाही असे प्रत्यक्ष गणितावरून मला दिसून आले. शिवाय पंचसिद्धांतिकेंत सौरसिद्धांतांतलें ग्रहस्पष्टीकरण निराळे आहेच. तेव्हा सदहू शेवटल्या अध्यायांतलें गणित सूर्यसिद्धांतांतले नव्हे, आणि तें मंदशीघ्रफलज्ञानावरून केलेले नाही; तर केवळ वेधांवरून बसविलेले आहे, असे सिद्ध होते. सारांश निदान पैतामह, वासिष्ठ, पौलिश हे सिद्धांत तरी रोमकाहून प्राचीन होत. रोमक सिद्धांत हिपार्कसच्या ग्रंथाधारें झालेला आहे. (हे मागे दाखविलेंच क रत आहे.) हिपार्कस आणि टालमी ह्यांचा अत्यंत निकट प्राचीन. संबंध आहे. तेव्हां रोमक सिद्धांत ज्या काली हिंदुस्थानांत आला त्या कालीं टालमीचा ग्रंथ झालेला असता तर तो इकडे येण्यास कोणतीही हरकत नव्हती. तो आला नाही यावरून रोमक हा टालमीहून प्राचीन असें सिद्ध झालें. अर्थात् पैतामह, वासिष्ट, पोलिश, रोमक हे टालमीहून प्राचीन होत. हे चार पांचही टालमीहन आणि सौर हे सर्वच टालमीहून प्राचीन याविषयी आणखी प्राचीन. स्वतंत्र प्रमाणे अशी:वर्षमान हिपार्कसाचे आणि टालमीचें एकच आहे. ते आझी दोघांपैकी कोणाचे किंवा इतर कोणाचेही घेतले नाही, असें मागें (पृ. १५९ व पृ. २०० यांत ) दाखविलेंच आहे. तसेच ग्रहमध्यम गति (पृ. २०२), मंदोचे आणि पात (पृ. २०६-१०): मंदकर्ण (पृ. ३१९), विक्षेपमानें (पृ. ३२४), अयनचलन (पृ. ३३४), रविचंद्रांची परममंइफलें आणि पंचग्रहांची परममंदशीघ्रफलें (पृ. ३६२-६७), क्रांतिवृत्ततिर्यकत्व (पृ. ३७०), सूर्यचंद्रलं बनें (पृ० ४४४), उदयास्तकालांश (पृ० ४४६ ) यां