पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/499

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ति प्राचीन (५०७) रोमक सिद्धांतांत पंचग्रहांचे गणित नाही. त्या सिद्धांताचें हिपार्कसच्या ग्रंथाशी साम्य आहे, तरी तोही टालमीहून प्राचीन मानण्यास कारण नाहीं असें थीबो ह्मणतो. हे चार सिद्धांत टालमीहून अर्वाचीन असें ह्मणण्यास, थीबो असें ह्मणतो, यावांचून दुसरे प्रमाण नाही. आतां दुसन्या पक्षी पाहूं. रोमकाहून इतर चार सिद्धांत प्राचीन असें प्रथम दाखवितों. पैतामह सिद्धांत रोमकाहून प्राचीन आहे याविषयी वाद नाही. बाकीचे तीन सिद्धांत त्याहून प्राचीन आहेत याविषयी मागें (पृ. १५९ यांत ) दोन प्रमाणे दिलींच रोमकाहून इतर आहेत. आणखी असें की वासिष्ठसिद्धांतांतल्या गोष्टी पंचसि द्धांतिकेंत आहेत, त्या रोमकाहून इतक्या बाल्यदशेत आहेत की वासिष्ट हा रोमकाहून प्राचीन आहे असे सहज दिसते. थीबो यासही ही गोष्ट मान्य आहे असें वरील त्याच्या अभिप्रायावरून दिसेलच. पौलिश आणि सौर यांविषयी पाहूं. वासिष्ठसिद्धांतांतले वर्षमान पंचसिद्धांतिकेंत नाही. असल्यास डा० थीबो ह्यास व मलाही ते समजले नाही. असले तरी त्यांत सूर्य काढण्याची रीति आहे तीवरून ते सायन मणजे सुमारे ३६५।१४।३२ आहे. वासिष्ठ सिद्धांतांतल्या गोष्टी इतक्या बाल्यदर्शत आहेत की त्यांतलें वर्षमान पुढील सिद्धांतांस कित्ता घेण्यासारखें नाहीं. इतर सिद्धांतांत वर्षमान सुमारे ३६५।१५।३१ आहे. इतकें वर्षमान ज्यांत आहे असा रोमकाहून निराळा सिद्धांत ह्मणजे पोलिश आणि सौर यांतला एखादा तरी रोमकाच्या पूर्वी नसता तर रोमकांतले वर्षमान सर्व सिद्धांतांत आले असते. ते आलें नाहीं यावरून पौलिश आणि सौर हे दोन्ही किंवा निटान यांतला एक तरी रोमकाहून प्राचीन असला पाहिजे. पौलिश आणि सौर यांनी पौलिश हा सौराहून बाल्यावस्थेतला आहे. यावरून निदान पोलिश तरी रोमकाहन प्राचीन असला पाहिजे. सारांश पैतामह, वासिष्ठ, पौलिश, हे रोमकाहून प्राचीन आहे. वासिष्ठ आणि पुलिश ह्यांत ग्रहांचे मंदफल आणि शीघफल हे दोन संस्कार आहेत ह्मणून ते टालमीचे अनुयायी, अर्थात त्याहून अर्वाचीन, अमें थीबो ह्मणतो. परंतु त्या सिद्धांतांत मंदशीघ्रफलसंस्कार नाहीतच. पंचसिद्धांति च्या शेवटच्या अध्यायांत ग्रहांची मध्यम आणि स्पष्ट स्थिति काढण्याचे गणित आहे. त्यांतल्या एका ग्रहाच्या गणिताचा मासला दाखवितों. त्यावरून माझ्या मणण्याचा खरेपणा दिसून येईल. शुक्राचे गणित असे आहे. "अहर्गणात १४७ वजा करून बाकीला ५८४ नी भागावें. भागाकारा इतके शुक्राचे जा होतात. इतक्या काळांत शुक्राची [ मध्यम ] गति वृश्चिकाचे पांच अंश (झणजे ७ राशि पांच अंश) आणि वीस कला होते. व शुक्र २६ दिवसांत [ उदयाच्या कालांशांइतका जाऊन पश्चिमेस उदय पावतो. अर्हगणांत उदयसंख्येचा अकरात अंश मिळवावा आणि त्यावरून शुक्रचार काढावा. तो असा. दर खेपेस साठसाठ अशा तीन अर्हगणांत तो अनुक्रमें ७४, ७३ आणि ७२ अंश जातो. ८५ दिवसांत ७७ अंश आणि पुढे तीन दिवसांत सवा अंश चालतों

  • त्यांतल्या काही मागें (पृ. १५४ ) दिल्या आहेत. बाकीच्या डा० थीबो याच्या पंचशिला तित पहाव्या.

tथीबोची पंचसिद्धांतिका, अ० १८ श्लोक १-५,